वाघाला रक्ताची चटक लागली की जस होत, तस आमच्या परिसरातील लोकाना झाल होत. निम्म्या किमतीत वस्तू मिळतात म्हणजे काय? तीन महिने दुकान सुरु होऊन झाले होते. त्यामुळे निम्म्या किमतीत मिळालेल्या वस्तू लोकांच्या घरोघरी दिसू लागल्या होत्या.
कोपऱ्यावर एक लहानसं दुकान होत. ते फारस चालत नव्हत. बंद पडल. त्यानंत अचानक ते पुन्हा सुरु झाल. वर पाटी होती श्रीविजय. नेमक कसल होत कळल नहाी, पण बाहेर बऱ्याच प्लॅस्टिकच्या बँगा, बादल्या, छोटे स्टुल वगैरे किरकोळ सामान होत. फारस कुणाच लक्ष जाण्याच कारण नव्हत. पण हलके हलके या दुकानात गर्दी दिसायला लागली बहुतेक गृहिणीची. कारण गृहिणीनाच लागणाऱ्या सर्व वस्तू दुकानात मांडलेल्या होत्या.
ते श्रीविजय दुकान बघितलत का? हो बघितल, का? घरुन विचारणा झाली. तिथे सर्व वस्तू निम्म्या किमतीत मिळतात. काय? मी बघत राहिलो. निम्म्या किमतीत वस्तू मिळतात. काय लॉटरी आहे का काय? लॉटरी वगैरे काही नाही, पण स्कीम आहे. म्हणजे समजा प्लॅस्टिकची बादली बाजारात पन्नास रुपयाला मिळते, तर आपल्याला ती पंचवीस रुपयाला मिहणार. म्हणजे आज जाऊन साडेबारा रुपये भरायचे, दीड महिन्याने परत जायच आणि उरलेली पन्नास टक्के रक्कम भरुन टाकायची आणि ती वस्तू घरी घेऊन जायची.
काहीतरी काय सागतेस? कस शक्य आहे? निम्म्या किमतीत वस्तू मिळणे म्हणजे काही तरी बनवाबनवी असणार. माल तरी खराब असेल किंवा काहीतरी गडबड असेल. मी हसण्यावारी उडवून लावल. पण येता-जाता निम्म्या किमतीत वस्तू विकणाऱ्या त्या श्रीविजय दुकानाकडे बघत होतो. गर्दी वाढताना दिसत होती. म्हटल माणस मूर्ख आहेत. पण मी मूर्ख म्हटल्यामुळे माणस तिकडे जाण्याची थांबली नव्हती.
आमच्य शेजारणीने साडेबारा रुपये भरुन बादलीच बुकिंग केलेले होत. इतर आसपासच्या बऱ्याच लोकांनी काही ना काही तरी बुकिंग केल होत. दीड महिन्यानी ती लोकविलक्षण बादली आमच्या शेजा-यांच्या घरी आली आणि काही तरी पराक्रम केल्याच्या थाटात त्या बदलीच दिव्य दर्शन येणाऱ्या-जाणाऱ्याला घडवण्यात आल. बादली मिळाल्यावर कुकरसाठी बुकिंग करण्या आल. निम्म्या किमतीला कुणाला नको.
बघता- बघता कुणाच घरी निम्म्या किमतीत टी-सेट आला. भिंतीवरच घडयाळ आल. निर्लेपची भांडी आली. फोल्ंडिगच्या खर्ुच्या आल्या आणि माझ्यावरच दडपण वाढल. काहीतरी गडबड आहे हे दिसत होतच, पण आता इथल्या लोकाना इतक्या वस्तू मिळतात म्हटल्यावर माझाही नाइलाज झाला. बर, वस्तू ताबडतोब मिळाली असती तर मी तरी कशाला नाही म्हटल असतं. पण पन्नास टक्के रक्कम भरायची आणि मग दीड महिना वाट बघायची, हे काही पटण्यासारख नव्हत. तरी हो ना करता करता शेवटी सहकुटुंब -सहपरिवार जाऊन साडेबारा रुपयांची पावती फाडून आलो. त्यावेळी बदलीसारख्या किरकोळ वस्तू बाद झाल्या होत्या आणि टेपरेकॉर्डर, टीव्ही, व्हीसीआर, व्हीसीपी, पियानोसारख्या महाग आणि चैनीच्य वस्तूंची विक्री सुरु झालेली होती आणि त्याच धुमधडाकयात बुकिंग सुरु होते.
वाघाला रक्ताची चटक लागली की जस होत, तस आमच्या परिसरातील लोकाना झाल होत. निम्म्या किमतीत वस्तू मिळतात म्हणजे काय? तीन महिने दुकान सुरु होऊन झाले होते. त्यामुळे निम्म्या किमतीत मिळालेल्या वस्तू लोकांच्या घरोघरी दिसू लागल्या होत्या. श्रीविजय आणि त्याच्या मालकावर लोकांचा पक्का विश्वास बसला हाता. तो बनवाबनवी करणार नाही, याबद्दल त्यांची खात्री झालेली होती. जो तो त्याची स्तुती करत होता. त्यामुळे माझ्या सारख्या शंकाखोर माणसालाही आपलच काहीतरी चुकत असाव असे वाटू लागलेले होत. आमच्याघरात आतापुढे काय बुकिंग करायच, याची जोरदार चर्चा सुरु झालेली होती.
आमच्य शेजारच्यानी साडेबारा हजार रुपये भरुन रंगीत टीव्ही आणि आम्ही हजार रुपये भरुन मिक्सर बुक कला. आता इतकी गर्दी, की पाय ठेवायला जागा नाही. गर्दी आवरायला चार पोलीस सततचा पहारा देत होते. आता तर आसपासच्या उपनगरातूनही लोक येऊन बुकिंग करत होते.
आमच्या मिक्सर यायला आता दहा दिवस बाकी होते. दुकानात मारुती- १००० च बुकिंग सुरु झाल. ८०,००० रुपये भरुन, दोन दिवसानी पाटी लागली. २०० मारुती कारच बुकिंग झालयाने मोटारींच बुकिंग आता बंद. पाटी लागली शुक्रवारी आणि रविचारी सकाळी १०:३० वाजता हा हा म्हणता बातमी पसरली, श्रीविजय पळाला. तुफान गर्दी. ट्रॅफिक जाम. आम्ही पावती घेऊन पळालो. दुकानापर्यंत पोचण मुश्कील. अनेकांच्या तोंडच पाणी पळाल. सीनियर पोलीस ऑॅफिसरही पाय आपटत फिरत होता. त्यांनी महिन्यापूर्वी मोटार सायकल बुक केली होती. हाहाकार माजला.
घरी आलो. बाथरुममध्ये बादली मस्त बसली होती. साडेबारा रुपयात मिळालेल्या त्या बादलीची खरी किंमत एक हजार रुपये होती.
-प्रकाश बाळ जोशी
१५ सप्टेंबर १९९४
Leave a Reply