आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. बांगड्या भरा. किंवा बांगड्यांचा आहेर पाठवून जो अपमान केला जातो याचे बऱ्याच जणांना राग येतो. कमीपणा वाटतो. पण मला तर उलट तो एक प्रकारचा सन्मान आहे असे वाटते. माणूस सौंदर्याचा भोक्ता आहे. नटणे मुरडणे हा एक स्थायी स्वभाव आहे. त्यामुळे कपडे व दागिन्यांचा सोस असतो. कालमानानुसार हे सगळे बरेच बदलून गेलेले आहे. दागिना तो स्री पुरुष यांना सारखेच होते. गळ्यात. कानात. नाकात. हातात. पायात. कमरेला. पण पुढे बदल झाला. कानात कर्णफुले म्हणून डूल. लोलक. कुड्या या स्त्रीसाठी. पूर्वी असाच प्रकार पुरुषही घालत असत. आता परत भिकबाळी किंवा त्याच प्रमाणे इतर आत्ताही घालतात. नाकात चमकी नथ असाच एक प्रकार भारतातील काही ठिकाणी पुरुष वापरतात. मला वाटते की बांगड्या हा प्रकार सुद्धा पुरुष घालत असावेत. आत्ताच्या काळात कडे. पायात काळा दोरा घातलेली अनेक तरुण मंडळी मी पाहिली आहेत.गळ्यात देखील घालतातच…..
यात बाकीच्या गोष्टी स्विकारल्या आहेत. मग बांगड्या म्हणजे अबला. दुर्बल. कर्तव्य न करणारे वगैरे गैरसमज का झाले हे समजत नाही. आत्ताच्या काळात स्री कुठे कुठे आणि काय काय करु शकते याची अनेक उदाहरणे आहेत. नैसर्गिक रित्या तिच्या शारीरिक अवस्थेत थोडा फार शक्तीचा फरक आहे म्हणून ती डगडमत नाही. हां काही क्षेत्रात बांगड्या घालून काम करता येत नाहीत म्हणून तिथे घालत नाहीत. पण हीच फॅशन झाली आहे आत्ताच्या काळात. माझ्या माहितीप्रमाणे बांगड्याचे गुणधर्म असे आहेत.
1) बांगड्या हातात घातल्यावर मनगटाला घर्षण होते. तेव्हा रक्त संचार सुरळीत व चांगला होतो.
2)घर्षणामुळे उर्जा निर्माण होते.
3)श्वसन व हृदया संबंधित आजार कमी होतात.
4)आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक संतुलन ऊत्तम राहते.
या अशा बांगड्या भरलेल्या आईच्या मायेचा हात डोक्यावर असल्यावर काय असते..
असाच हाच बहिणीचे प्रेम आणि भावाबद्दलची आस्था दाखवते.
असाच हात एक पत्नी म्हणून पाठीशी उभी राहून त्याला यशस्वी करते. छोट्याशा बांगड्या घालून दमलेल्या बाबाच्या गळ्यात रेशमाचा करपाश घालणारी त्याच हातात हिरवा चुडा भरलेली लेक सासरी जाताना बाबांच्या गळ्यात हात घालून बाबा काळजी घ्या असे सांगून निघते तेव्हा बाबाचा कंठ कसा दाटून येतो याचे वर्णन व्यक्त करता येत नाही. हे सगळे कमीपणाचे आहे का? वरील बांगड्याचे गुणधर्म एकदा वाचलेले आहेत त्यामुळे असे वाचलेले आता यात विनोद म्हणून पुरुष मंडळी बांगड्या घाला असेही म्हणतील. पण मला सांगायचे एवढेच आहे की बांगड्या म्हणजे कमीपणा नाही. उलट तो चांगल्या अर्थाने समजून घ्यायला हवे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते हे तुम्हीच ठरवा..
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply