देशहितासाठी ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला पण त्याच्या अंमलबजावणीत अमूल्य योगदान दिले बँक कॅशियर्सनी !
प्रचंड गर्दी, ताणतणाव, चिडलेल्या, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे ग्राहक – ग्राहक नाहीत तर अनोळखी माणसं यांच्या लांबच लांब रांगा , यात काळजीपूर्वक , जबाबदारीचे काम – थोडीशी चूक की ती न निस्तरता येण्याजोगी – डायरेक्ट खिशालाच चाट –
अशा परिस्थितीत अविरत, मान खाली घालून तासन तास, तेच आणि तसेच काम – बरं तेही एका दिवसापुरते नाही तर तब्बल ५० दिवस करायचे, अचानक हक्काच्या सुट्ट्या रद्द करून !
मान लिया ! ??
देशसेवा ही अजून ती वेगळी काय ? आपल्याकडे माहिती असलेली देशसेवा / देशभक्ति म्हणजे सीमेवर शत्रूशी लढणे.
– बँक कर्मचारी आत्ता करत असलेले काम म्हणजे तशीच देशसेवा नव्हे काय ?
याची आपण सर्व लोकांनी जाणीव ठेवू या ! यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्याशी सौजन्याने वागू या ! बँका बंद होण्याच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी जाऊन नंबर लावू या कारण या लोकांचे रेल्वे तिकीट खिडकी सारखं नसतं की वेळ झाल्याबरोबर खिडकीच बंद! – उलट, तेव्हा आत आलेल्या शेवटच्या व्यक्तिला सेवा द्यावी लागते – त्यासाठी अधिकचे खूपच काम पडते !
शेवटी बँक कर्मचारी ही सुद्धा माणसंच आहेत याचे भान आपण सर्वांनी ठेवले तरी पुरे !
बघा पटलं तर ! हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे ही विनंती !
Leave a Reply