नवीन लेखन...

मराठी कवी, गीतकार आणि नाटककार नरहरी गणेश कमतनूरकर ऊर्फ बन्याबापू

मराठी कवी, गीतकार आणि नाटककार नरहरी गणेश कमतनूरकर ऊर्फ बन्याबापू यांचा जन्म २८ मे १८९६ रोजी सांगली येथे झाला.

नरहरी गणेश कमतनूरकर हे लेखक राम गणेश गडकरी यांचे विद्यार्थी. पुण्यात आल्यावर कमतनूरकर गडकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून नाटके लिहू लागले. कमतनूरकरांच्या नाटकांतील पदे बहुधा त्यांनी स्वतःच लिहिलेली असत. ’श्री’ या नावाचे एक संगीत नाटक कमतनूकरांनी १९२२ साली लिहिले. घोड्यांच्या रेसच्या नादावा दुष्परिणाम हा नाटकाचा विषय होता. ’ललित कलादर्श’ या नाट्यसंस्थेने हे नाटक १९२४ साली रंगभूमीवर आणले, पण तत्कालीन व्यावसायिक रंगभूमीवर मात्र काही दिवसातच ते अपयशी ठरले. तरीही, कमतनूकरांनी लिहिलेल्या संवादांचा नूर काही औरच आहे हे समीक्षकांच्या नजरेस आले, आणि कमतनूकर हे नाट्यसृष्टीतील एक प्रतिभावंत लेखक आहेत, हे सिद्ध झाले. नाटकाची संहिता राम गणेश गडकरी यांच्या खटकेबाज संवादांची आठवण करून देणारी आहे.

’श्री’चे ५०-६० प्रयोग झाल्यानंतर ‘ललित कलादर्श’ने प्रयोग करणे थांबवले. मात्र, ललित कलादर्शच्या शतक महोत्सवात हे नाटक परत रंगभूमीवर आणायचे असे डोंबिवलीकरांनी ठरवले. आणि त्याप्रमाणे ४ जानेवारी २००८ रोजी या नाटकाचा प्रयोग ’डोंबिवली भूषण’ शं.ना. नवरे यांच्या उपस्थितीत झाला.

’श्री’ नाटकाची मूळ संहिता २५० पानांची होती, ती ६० पानांवर आणली गेली. अप्पासाहेब रावबहादुर, त्यांचा जुगारापायी बिघडलेला मुलगा कुसुमाकर, त्यांची तरुण मुलगी श्री व घरजावई श्रीकांत, कुसुमाकर याची पत्नीस कात्यायनी व कुटुंबाला पूर्णपणे बरबाद करणारा अप्पासाहेबांचा मित्र व खलनायक विश्राम आणि रेसचा बुकी सत्यवान सत्यवादी अशी मोजकी सात-आठ पात्रे नाटकात आहेत. नाटकातल्या ’सत्यवान सत्यवादी’ नावाच्या इरसाल पात्राची भूमिका सुहास नवरे यांनी व्यावसायिक अंदाजाने खुलवली होती. श्रीकांतला घोड्याच्या रेसचा नाद सत्यवान आणि विश्राम हे दोघे लावतात; पण गांजेकस असलेला सत्यवान मनाने चांगला आहे. त्यामुळे त्याच्या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत.

विश्रामची भूमिका डोंबवलीकर विवेक जोशी यांनी, अप्पासाहेबांची सुरेश ताम्हाने यांनी आणि ’श्री’ची प्रज्ञा देवस्थळे यांनी रंगविली होती नाटकातल्या पदांना विलास हर्षे यांनी चाली बसवून दिल्या होत्या. हे नाटक वेलणकर यांच्या ’सार्थक’ या संस्थेने रंगभूमीवर सादर केले होते. बापूराव पेंढारकार जेव्हा हे ’श्री’ नावाचे नाटक रंगभूमीवर सादर करायचे, तेव्हा पडद्यावर कॅमेराच्या साहाय्याने ते घोड्यांची शर्यत दाखवायचे. लोकांसाठी तो सर्वाधिक आकर्षणाचा मामला होता. २००८ साली डोंबिवलीत झालेया प्रयोगात मात्र पडद्यावर शर्यती दाखवणे शक्य झाले नव्हते. नरहरी गणेश कमतनूरकर यांचे निधन १३ डिसेंबर १९६९ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..