या वाट वाटणीसाठी
घालती बापाचे वाटे
असे कोणते ठेवले
पुरून धनाचे साठे?
राख भरती डोक्यात
कुणी फुकती कानात
भाऊ भावाचा वैरी रे
असं औषध क्षणात
जमिन तुकड्यापायी
माणूस विसरे धर्म
एका आईची लेकरं
कसे करती कुकर्म
जागा बांधाच्या वांध्यान
देश, माणूस तोडला
मळा पडीक पाडला
जीवा जुगार मांडला
बघ साडेतीन फुट
जागा तुला रे जाळाया
लोकं मयता शेवटी
लावी कर्दुडा तोडाया
— विठ्ठल जाधव.
vitthalj5@gmail.com
शिरूरकासार,बीड
Leave a Reply