एक बाबा थकलेला कमरेमध्ये वाकलेला
हातात काठी तुटका चष्मा उदासवाणा बसलेला
अंगावर सुरकुत्या चुरगळलेल्या स्वप्नांच्या
फाटकं धोतर फाटका सदरा अनवाणी चाललेला..!
कधीकाळचा सूर्य आज निस्तेज झाला आहे
करपलेल्या मनाचा एक कोपरा ओला आहे
डोळ्यांवर हात ठेवून वाट अजून पाहतो आहे
येईल कधीतरी लेक माझा शहरात राहतो आहे..!
वाट पाहून वाटा सरल्या नवी वाट दिसत नाही
काळोखात रडतो चंद्र, सूर्य कधीही हसत नाही
जगरहाटी चालू आहे वेळ कुणाला मिळत नाही
रोज मरणा-या बापाचं मन कधीच कुणाला कळत नाही…!!
राजेश जगताप
मुंबई..
९८२१४३५१२९
Leave a Reply