एकदा देव पृथ्वीवर आले. चालता चालता त्याना तहान लागली. इतक्यात समोरून दूधवाला येत होता. त्याला थांबवून देवाने त्याच्याकडे तहान भागविण्याकरीता थोडे दूध मागितले. दूधवाला म्हणाला, “असं मोफत दूध मिळत नाही.” दूधवाल्याचे उत्तर ऐकून देव पुढे चालतच राहिले.
पुढे एका लग्नाची वरात होती. वरातीत एक माणूस दारू देत होता. देवाने त्याच्याकडे दारू मागितली. दारूवाला म्हणाला, “हवी तेवढी पी, नाच, मजा कर”.
देव त्या दारूवाल्यावर प्रसन्न झाले आणि त्याला वर दिला “लोक तुझ्याकडे शोधत शोधत येतील. तथास्तू!”
दूधवाल्याला शाप दिला “तुझे दूध खपवण्याकरीता तुला दारोदार जावं लागेल.
Leave a Reply