बस्तर मधील अबुजमाड डोंगर रांगा व जंगले छ.ग. राज्याचा बस्तर जिल्ह्याच्या पचिमेकडे Maharashtra and ANDHRA Pradesh या राज्यांच्या सीमेला भिडलेल्या आहेत. ३९०० किमी डोंगर रांगा ,संपूर्ण जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७० ते ७५ हजार स्क्वे.की. ( गोवा राज्या पेक्षा मोठे) ब्रीटीश राज्य काळात हा संपूर्ण प्रदेश भारतापासून वेगळा विभाग म्हणून ठेवला की ज्या विभागाचे भौगोलिक मोजमापन कधीच झाले नव्हते, खर तर अजूनही त्याचे संपूर्ण मोजमापन पुरे झालेले नाही.ब्रीटीश काळात भारतीय नागरिकांना तेथे जाण्याची परवानगीच नव्हती.या भागात २२० ते २४० खेडी असून ३० ते ४० हजार आदिवासी राहतात.यातील प्रमुख उप जिल्हे बिजापूर,नारायणपूर व दन्तेवाडा;येथील प्रमुख आदिवासी पोटजाती गोंड,मारीया,अबूस मुरिया, ह्ल्बास,संपूर्ण प्रदेश इतका दुर्गम धड पायवाटेचे रस्तेही नसल्याने जगाशी संबंध नसलेला दुर्गम प्रदेश, अबुज् माड हा गोंड भाषेतील शब्द, त्याचा अर्थ ( अपरिचित माहीत नसलेल्या डोंगररांगा ) .रामायण काळातील दंडकारणय हा हाच भाग होता.या जंगलात द्न्डका नावाचा राक्षस राहत असे ,त्यावरून हे नाव पडले.याच ठीकाणी रामाला बोरे देणारी आदिवासी स्त्री शबरी राहत होती,येथे शबरीचे मंदीर असून देवीप्रमाणे तिची पूजा केली जाते.
लोकसंख्या अतिशय विरळ ( १० माणसे स्व्केकीमी ). isro satellite ने या भागाचे ढोबळ भौगोलिक आराखडे काढले आहेत. पावसाळ्यात अनेक खेड्यांशी ६ महिने संबंधच नसतो.
पण अशा दुर्गम शांत घनदाट जंगलाचा गैरफायदा नक्षलवादी ( People”s liberation guerilla army ) ( PLGA ) यांनी घेतलेला असून त्यांचे अनेक गुप्ततळ इं जंगलात आहेत जेथून त्यांचे समांतर सरकार चालवले जाते, करवसुली व खंडणी मार्गे लक्षावधी रुपये जमविले जातात, सरकारची जुजबी यंत्रणा त्यामुळे आदीवसी कोंडीत सापडलेले असून त्यांना वाली कोणीच नाही रोज बंदुकीच्या गोळ्यांच्या फैरी,सुरुंग लावून घडवलेले स्फोट, हजारोनी मरण पावणारे पोलीस लष्कराचे जवान , आदिवासी, आणी नक्षलवादी हे अघोषित युद्ध आजमितीला न संपणारे आहे ही आदिवासींची शोकांतिका आहे.
OPERATION ABUJMAD
अबुजमाड म्हणजे एखाद्या दंतकथेतील असावा असा दुर्गम प्रदेश,ज्या भागात १२ मुंडी असलेले प्राणी राहतात, अशी आदिवासींची ठाम धारणा आहे.या भागात कोणत्याही राज्याचा सामान्य माणूस वा पोलीस प्रवेष करण्यास धजत नाहीत,असा हा भाग १९८० सालापसून नक्षलवादी चळव्लीची कर्मभूमी आहे, ज्या चळवळीत भारतातील अनेक राज्यांची तरुण मुले व मुली सहभागी आहेत, ज्यांच्याजवळ अद्यावत शस्त्रे आहेत. भारत सरकार चे सैनिक. राज्यांचे पोलीस व नक्षलवादी यांच्यात गेली ४० वर्षे अघोषित युद्ध चालू आहे’
२०१२ साली Central Reserve Police Force च्या जवानांनी या भागात प्रथमच पाउल टाकले व या विभागाचे सरवेक्षण करण्याची मोहीम काढली , त्यात नक्षलवादी बरोबर लढाही द्यायचा होता. या मधून बरीच आश्चर्यकारक माहिती गोळा झाली.ब्रीटीश काळापासून दाखविण्यात आलेल्या खेड्यांच्या जागा प्रत्यक्ष जागे पासून अनेक किमी दूर आहेत.तर काही खेडी अस्तित्वातच नाहीत. गुगलचे नकाशे तर फारच गोंधळात टाकणारे आहेत.काही ठिकाणी बांबू वनाची जाळीची जाळी पसरलेली असून त्या जागा नक्षलवादिंच्या लपायच्या जागा आहेत असे वाटत होते,पण प्रत्यक्षातते प्राण्यांना पकडण्याचे सापळे आदिवासीनी केलेले होते.
नारायणपूर गावातून कोब्रा पोलीस संघटनेच्या विविध तुकड्या सर्व दिशांना शोध मोहीमे करण्या साठी पायी निघाल्या,कीरनुसर हे सर्वात शेवटचे पोलीस ठाणे पुढे एकही ठाणे नाही, ना वीज ना फोन एकमेव सडक डोंगर रांगात काही अंतरा वर लुप्त होते,या मोहिमेत जवळ जवळ ८00 जवान होते,ते WALKIE TALKIE AND VIA SATELLITE रायपुर मधील मुख्य पोलीस ठाण्याशी संपर्कात होते,जरूर पडल्यास भारतीय वायुदुताची विमाने मदतीला सज्ज होती.या काळात ८ वेळा नक्षलवादी बरोबर गोळीबाराची धुमचक्री झाली, एकदा तर तासभर छोटे युद्धच झाले. जवळ जवळ १२५ किमी प्रवास घनदाट जंगलातून आयोजीत
करण्यात आला.एकूण ३ जवान जखमी झाले बाकी मोहीम यशस्वी पार पडली.ही सर्व मोहीम नवीन खडतर शिक्षण देणारी होती.रात्री जंगलातील पसरलेल्या झाडांच्या भयभीत करणाऱ्या सावल्या होत्या, ही तर नुसती चुणूक होती,१५ % पेक्षा कमी विभाग न्याहाळता आला होता, बरेच काम असून बाकी आहे.
हिकोनार नावाच्या खेड्यात माओवादीचा मोठा तळ होता, तो त्यानी सोडून दिला होता.तेथे जी कागदपत्रे व पुस्तके मिळाली,ती फार धक्कादायक व शासनाला हादरा देणारी आहेत.या तांबड्या तप्त विभागात काही कागदपत्रे होती ज्यामध्ये IAS परीक्षेत अडथळे कसे आणायचे,व परीक्षा उधळून लावायची याच्या सूचना होत्या.काही पुस्तकात how to make rockets to bring down helicopters या बाबतचे माहिती नकाशा सकट होती या खेड्यात बंदुका व दारुगोळा बनविणारा छोटा कारखाना पण होता, ज्या बद्दल सरकर कडे नोंदही नव्हती.माओवादी गोरिला युद्धावरील Dixon Hilmon यांनी १९५० सालात लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक तेथे होते.बौम्ब कसे बनवायचे या वरील पुस्तके इंग्रजी,तेलगु, हिंदी व मराठी भाषेत होती.औषधाच्या पेट्या,Modern Photo PRINTER,सौरउर्जेवर चालणारे चार्जर या सेव गोष्टी एका आदिवासी बाईच्या चंद्रमोळी झोपडीत मिळाल्या.बिस्तरयात आदुनिक AK47 RIFLE होती.अनेक छोट्या बंदुका पडलेल्या,१९९५ सालातील Andhra Pradesh मधील घडवलेल्या चळवळीची कागद पत्रे थेट अबुज माड पर्यंत पोहचलेली होती.नक्षलवादी हातात ग्रेनेड घेऊन helicopter engine वर मारा करून ते पाडू शकतात. ही फार भयानक परीस्थिती आहे.या प्रदेशात शिरणे म्हणजे कोणत्याही क्षणी मृत्यूला सामोरे जाणे आहे,एके वर्षी १२ जवानांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला,तेंव्हा त्यांच्या शवाला हात लावण्यास कोणीही पुढे जाऊ शकत नव्हते, इतकी दहशत त्यांची आहे. शेवटी दोन दिवसांनी सर्व शवे जोखीम पत्करून बैलगाडीतून एका खेड्यात आणण्यात आली.
अबुजमाड भागात सरकारी यंत्रणाचे अस्तित्व नाहीच.कोणताही रस्ता वा पूल बांधल्यास ते सुरुंग लावून उडवले जातात.माओवादी आपल्या जनता सरकार मार्फत आदिवासी मुलांकरता शाळा चालवतात,तेथे शिक्षक नाहीत मुलांना जेमतेम अक्षर ओळख आणी माओ प्रेमाची गाणी शिकवली जातात. दोन्ही राज्ये आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत, सरकारने हिम्मत दाखवली तर आदिवासीना दिलासा मिळेल, नाहीतर त्यांचे जीवन वाईटा कडून अधिक अधोगतीच्या मार्गाला लागेल.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply