नवीन लेखन...

बटाटा वडा

पुण्या-मुंबईकडील खवैयांच्या हिटलीस्ट वर बटाटे वडा हा अत्युच्य स्थानावर विराजमान आहे. खरतर एकटा बटाटे वडा एक हाती तुमची क्षुधा शांत करु शकतो तरी पण, माझ्या मते, स्लाईस, पाव, देठासकट तळलेली हिरवी मिरची, तळणीतला चुरा, पुदिना चटणी, चिंगु चटणी ही सगळी नवरदेवाच्या वरातीत स्वतःला मिरवुन घेणारी मंडळी असुन व्यावसायीकांनी वाढवलेल अवडंबर आहे. लोणावळ्यातल्या कामतनी गोडसर चटणीमधे आवळ्याचा शिडकावा मारून या वरातीत भर घातली. पाच वर्षापूर्वी दोन वड्यांची एक प्लेट पन्नास रुपायला होती कामतकडे. त्याच्या बरोबर ही चटणी नैवेद्यासारख्या छोट्या वाटीत मिळायची; अजुनही मिळत असेल. नोटाबंदीनंतर माझ तिकडे जाण झाल नाहीये – या वाक्याचा कामत वड्याशी सबंध नाहीये. असो.

वड्याचा वावर वेगवेगळ्या अकारात असतो.

गेल्या काही वर्षांमधे पुण्यात जेवणाच्या पंक्तीत डिंगणकर, मोघे वगैरे केटरर्सनी इंट्रोड्युस केलेला लहान अकाराचा वडा खूप भाव खाउन जातोय. याच शिशु वड्याला भांडारकररोडच्या पीवायसी मधे बाबा वडा म्हणतात. खाताना मोजायच नाही एवढच पथ्य असत!!

सर्वमान्य अकाराच्या वड्याच्या निर्मितीचे श्रेय मी पुण्यातील शिस्तबध्द गोडस्यांनाच देईन. गोडस्यांकडे एक रुपायला एक अत्यंत चविष्ट वडा मिळत असे. वड्याची आँर्डर देउन 360° अंशात मान फिरवुन हाँटेलच्या शिस्तीविषयक सर्व पाट्या वाचुन होईपर्यंत गरम वड्यांच पाकिट हातात पडायच. विशेष म्हणजे पिठाच्या आवरणात सोड्याचा लवलेशही नसायचा. काही दिवस गोडस्यांचा वडा बालगंधर्वच्या कँफेटेरीयातही मिळायचा. कालांतराने पुण्यात जोशी वडेवाले आणि पाठोपाठ वडेवाले जोशी उदयास आले आणि वडापाव तळागाळात पोहोचला. भुकेल्यांच्या भुकेचा प्रश्ण स्वस्तात सुटला.

R&D नुसार सर्वमान्य अकाराच्या वड्याच्या पुढची पायरी छोटा बाबा वडा. त्याही पुढची पायरी म्हणजे विठ्ठल वडा; हा वड्यांचा सरताज असुन हे विठ्ठल कामतांच क्रीएशन आहे. मध्यम आकाराची पूर्ण प्लेट हा वडा व्यापतो व याच्याभोवती फरसाण कांदा वगैरेची आरास असते. हा जेन्युइन कामत जाँईंटवरच खायचा आसतो अन्यथा विठ्ठल वड्याचा पचका वडा होउ शकतो.

कर्जतच्या मध्यम अकाराच्या दिवाडकर वड्यानीही पुणे मुंबई पुणे प्रवासात स्वतःचे स्थान निर्माण केले असुन कल्याणच्या खिडकीवड्यानीही पुण्यात आजकाल चांगला जोर पकडलाय. तिखट पण चवदार असतात हे दोघेही!

शेवटी वडा तो वडाच पण तरीही चवीत थोडाफार फरक असणारी छोटी मोठी बरीच ठिकाण पुण्यात आपापल स्थान पक्क करुन आहेत. रमणबागेजवळ प्रभा विश्रांती गृह ( लिमिटेड स्टाँक, वेळेच बंधन, पुणेरी शिस्त), टिळक रोडला बादशाही, केळकर म्युझियमजवळ बापट, दिनानाथजवळ वझे यांचा खडकी वडा हे मात्र अघाडी टिकउन आहेत.

दुबईत ईतर देशातुन येणारा महाकाय बटाटा हा खूपच ठिसुळ असुन त्याला बटाटे वड्यात सामावण हे खरच कौशल्य आहे. एक दोन ट्रायलनंतरच हाती यश येउ शकत. असो.

हे सगळ जरी खर असल तरी कोथरुडच्या, महात्मा सोसायटीत, कांचनगात होणारा बटाटे वडा हाच पद्मविभूषणचा मानकरी आहे !!!

— प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

1 Comment on बटाटा वडा

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..