बीजाचे समर्पण पहावे,स्वतःला देऊन टाकते,
एक तरु जन्माला यावे,
म्हणूनच स्वतःला गाडते,—!!
पुन्हा मातीत रूजून,
एकदम कात टाकते,
अंकुराचा स्वरूपाने ,
मातीच्या कुशीत येते,–!!!
काळी आई कुरवाळते ,
सर्व संगोपन करते,
बघता बघता नजरेत भरते,
अंकुराचे फोफावणे, –!!!
अंकुराचा त्याग करून,
बीज वाढीस लागते,
रोपट्याच्या स्वरूपात,
सानुले झाड उगवते ,–!!!
रोपट्याला फुटती पाने,
त्यांचेही वर जाणे,
करता करतां झाड वाढते,
हिरवेगार, डौलदार दिसते,–!!!
हळूहळू संपन्न होते,
घोंस लागती फुलाफळांचे,
झाड होते मोठे,
कधी रूप घेते वृक्षाचे,–!!!
फळे-फुले भरलेले,
वृक्ष घनदाट डंवरलेले,
कोसळती किती फळेफुले,
शेवट पुन्हा बीजरुपे,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply