नवीन लेखन...

बेळगाव आणी गोयकार

गोव्यासाठी बेळगाव फारच जवळच महत्वाचे शहर आहे. आपल्या आहारातील मुख्य घटक दुध, भाजीपाला, फळे, अंडी हे गोव्याला बेळगावकरच पुरवितात.

पोर्तूगिज काळात गोव्यात दुधाचा फारच तुटवडा होता. पाहुण्याना चहात नारळाच दुध वापरून सरबराई करीत असत. दुधजन्य पदार्थ मिळतच नसे. भरपूर प्रमाणात साखर वापरलेला पेढा मुल खात असत. बेळगाहून कोणी आला कि हमखास पेढा, कुंदा घेऊन येई.

गोवा या शब्दातील गो म्हणजे गाई. भरपूर गाई असणारा प्रदेश पण पोर्तूगिजांनी काय बर केल म्हणून गोव्यातील गाई नाहिशा झाल्या असतील! त्याकाळी गोव्यातील क्रिश्चनांना श्रीखंड, साजूक तूप माहितीच नसे.

बेळगावला पणजीतून बसन जायला (१५० कि.मी.) पाच सहा तास लागे. त्याकाळी नवीन सिनेमा गोव्यात वर्ष दोन वर्षानी प्रदर्शित होत. नवरंग, संगम अशी चारपाच सिनेमा गृह बेळगावात जवळपासच होती.काही हौशी सकाळी गोव्यातून निघाले, दुपारी बेळगाव पोहोचले. दोन, तीन सिनेमा पाहिले. रात्र तेथे काढली. सकाळी वीस तीस किलो भाजी घेतली. इतर खरेदी केली.आणखी एक सिनेमा पाहिला व दपारी तीन चारला निघून रात्री गोव्यात. मडगाव वास्को, सावर्डे येथील हौशी हे ट्रेनने बेळगाव गाठत व परतत.

आता गोव्यातही मिठाईची चांगली दुकाने आहेत. आता गोव्यातील सर्वथरातील लोक साजूक तूप, लोणी, श्रीखंड भरपूर खातात.

श्रीकांत बर्वे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..