माझा एक मित्र त्याचे वडील वारल्या नंतर तीन – चार महिन्यांनी मला वाटेत भेटला. मी त्याची चौकशी केली असता तो मला म्हणाला , “आई आणि भाऊ काकाच्या मुलाच्या लग्नाला गावी गेले आहेत.” त्यावर मी म्हणालो,” बर आहे ! त्यामुळे आईला थोडा बदल मिळेल, त्याचे घर माझ्या घराच्या वाटेतच असल्यामुळे मी त्याच्यासोबत त्याच्या घरी गेलो. बोलता – बोलता त्याने मला त्याची जन्मपत्रिका दाखविली. आम्ही पूर्वी चर्चा केल्या प्रमाणे तो व्यवसायाने सिव्हील इंजिनिअर असला तरी त्याचा माझ्यावर माझ्या ज्ञानावर विश्वास होता. मी कवी लेखक आणि पत्रकार असलो तरी मला ज्योतिष्य या विषयात भारी रस होता एक अभ्यासाचा विषय म्हणून ! हे त्याला ज्ञात होते. मी त्याची पत्रिका वाचली तर वरवर उत्तम होती त्या पत्रिकेत त्याच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल कोणतीच पूर्व सूचना नव्हती. मी त्याला तसे स्पष्ट सांगितले पण तरीही मी माझ्या पद्धतीने नंतर त्याच्या पत्रिकेचा अभ्यास करणारच होतो. मला व्यक्तींश हे जाणून घेण्यास रस होता की खरचं ज्योतिष शास्त्राला काही आधार आहे की ते एक थोतांड आहे ?
बोलता – बोलता तो मला म्हणाला,” चार दिवसापूर्वी चार – पाच नंदीबैलवाले आले होते तेव्हा माझा भाऊ दरात उभा होता आणि मी वर माळ्यावर होतो. गॅलरीत त्यातील एक माणूस माझ्या भावाजवळ येऊन म्हणाला, तुझे नाव …तुझ्या भावाचे नाव …तुझ्या वडिलांचे नाव …तुझा मोठा भाऊ …आहे तुझ्या वाडीलांचा अचानक मृत्यू झाला वगैरे हे सारे ऐकल्यावर मित्राच्या आईने त्याला घरात बसवून घेतले त्यावर आणखी काही गोष्टी सांगितल्यावर तो म्हणाला “तुमच्या नवऱ्यावर एका बाईने करणी केली होती म्हणून ते अचानक गेले. त्या बाईचा बंदोबस्त करायचा असेल तर नऊ हजार खर्च करावे लागतील नाही केला तर त्याचा त्रास तुमच्या मुलांना होऊ शकतो. ती करणी करणारी बाई दोन दिवसांनी नारळाच खोबरं घेऊन तुमच्या घरी येईल. तो काही बोलण्यापूर्वीच मी त्याला म्हणालो,” ते भोंदू होते ! त्यांनी सांगितलेल्या चार गोष्टी खऱ्या असल्या तरी ते भविष्य जाणणारे नव्हते. ते या चाळीत भांडणाचे आणि द्वेषाचे बीज पेरून आपला स्वार्थ साधून निघून गेलेले आहेत, त्यांनी आजूबाजूच्या चार घरात काय सांगितले असेल याचा मी अंदाज बांधू शकत होतो. श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी ! मी मित्राला म्हणालो ,” त्यांचा फार विचार करू नकोस ! त्याची पत्रिका मी माझ्या पद्धतीने पाहिल्यावर माझ्या लक्षात आले त्याचा जन्म सत्तावीस नक्षत्रातील सर्वात विषारी समजल्या जाणाऱ्या आश्लेषा नक्षत्रात झालेला होता त्यामुळेच त्याच्यावर हे आकस्मित संकट ओढावले होते त्याला निमित्त मात्र त्याच्या वडिलांचे बिडी पिणे आणि त्यामुळे झालेला कर्करोग होता भविष्य कोणालाही टाळता अथवा बदलता येत नाही ज्योतिष शास्त्रामुळे फक्त त्याचा अंदाज घेता येऊ शकतो इतकंच …
— निलेश बामणे
Leave a Reply