नवीन लेखन...

बेन हर (१९६०)

कल्पना करा..हजारो रोमन नागरीक दुतर्फा उभे आहेत.
ती जगप्रसिद्ध चॅरिअट रेस अर्थात रथांची शर्यत सुरु होते आहे..
एका रथात दिमाखदार जुदाह बेन हर म्हणजेच चार्लटन हेस्टन सफेद घोड्यांनिशी उभा आहे..
दुसऱ्या रथात दृष्ट मेस्साला अर्थात स्टिफन बॉयड काळ्या घोड्यांनिशी रुबाबात जातो आहे..
रेसमधे सहभागी सारे रथी अर्थात चॅरिअटर्स मैदानाला फेरा मारुन रोमन राजसत्तेला व नागरीकांना मानवंदना देतात..
आणि एक विलक्षण भारावणारे राजसी पार्श्वसंगीत चालू होते..
जे आजही ‘मिल्कस रोजा’ चे ‘परेड ऑफ चॅरिएटर्स’ म्हणून प्रसिद्ध आहे..
एखाद्या सिनेमाचा आस्वाद करताना त्याचे थिम म्युझीक त्या सिनेमाशी किती एकरुप होउ शकते याचे सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे बेन हर. सिनेमाच्या प्रत्येक फ्रेमला जिवंत करणारे एक विलक्षण पार्श्वसंगीत बेन हर हा सिनेमा पाहताना तुम्ही अनुभवत राहता. इतके की सिनेमा संपल्यानंतरही बरेच तास ते तुमच्या डोक्यातून जात नाही. ते सारे प्रसंग तुम्हाला राहून राहून आठवत राहतात..अगदी तुमच्या स्वप्नातही..ही कमाल मिल्कस रोजाच्या जबरदस्त थीम संगीताची आहे.
चॅरिअट रेस असो, किंवा गॅलेमधला बोट रोविंगचा तो सिन असो, जिजस पाण्यासाठी व्याकुळ बेन हर ला पाणी पाजतो तेंव्हा व पुढे जिजस क्रुस घेउन चालताना कोसळतो तेंव्हा बेन हर त्याला पाणी पाजतो तो सीन असो, किंवा शेवटी लेपर्स रहात असलेल्या भागात आपल्या आईला व बहिणीला बेन हर शोधतो ह्या साऱ्याच सिन्स मधे अतिशय राॕयल संगीत ते अतिशय करुण संगीत त्या त्या सीन मधे आपली मती गुंगवून सोडते.

Lew Wallace यांच्या ‘बेन हर-अ टेल ऑफ दी क्राइस्ट’ या सुप्रसिद्ध पुस्तकावर आधी १९२९ मधे याच नावाचा सिनेमा आला होता. एम.जी.एम ने हा सिनेमा पुन्हा बनवायचा ठरवला व १९५९ पर्यंतचा तो सर्वात खर्चीक सिनेमा ठरला ज्याच्या निर्मीतीवर या काळचे १५ कोटी डाॕलर्स खर्च केले होते. एक पूर्ण वर्ष,आठवड्याचे सहा दिवस रोज बारा-चौदा तास शुटींग करीत हा आतिभव्य सिनेमा पूर्ण झाला. पोस्ट प्रोडक्शनला सहा महिने लागले. त्या दरम्यान मिल्कस रोजा व त्याच्या सहकाऱ्यांनी या सिनेमासाठी ट्रेंड सेटर असे थिम म्युझीक बनवले. And..the rest is history.

हॉलीवूडवर या सिनेमाच्या थिमचा जबरदस्त पगडा पुढे जवळ जवळ दिड-दोन दशके राहिला. चित्रपटाने जगभर तिकीटबारीवर जबरदस्त धुमाकूळ घातला. तोपर्यंतचा ‘गॉन विथ दी विंड’ नंतरचा तो सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. तोवरच्या कोणत्याही सिनेमाला मिळाले नाहीत इतके तब्बल अकरा ऑस्कर पुरस्कार १९६० साली या चित्रपटाने पटकावले. त्यात अर्थात होते सर्वोत्तम सिनेमा, दिग्दर्शक, सर्वोत्तम अभिनेता (चार्लटन) याबरोबर अर्थातच मिल्कस रोजा ला सर्वोत्तम संगीताचे ऑस्करही मिळाले.

माझ्या आईने मला व माझ्या भावाला लहाणपणी एकट्याने काही इंग्रजी सिनेमे पहायची परवानगी दिली होती त्यातला अगदी सुरवातीचा म्हणजे बेन हर. असे भव्य सिनेमे पहायची सवय नसल्याने व असे अंगावर येणारे पार्श्वसंगीत आधी कधी न ऐकल्याने माझा आठ वर्षाचा भाउ घाबरुन गेला होता. मी त्याला कसेबसे हाताला धरुन सिनेमा होइपर्यंत बसवून ठेवले होते हे मला अजून आठवतय.

कारण मला हा सिनेमा बघायचा होता..पूर्ण…अगदी डोळे फाडून आणि कान देउन. मिल्कस रोजा च्या संगिताने अकराव्या वर्षी घातलेली मोहिनी आज तीन दशकांनंतरही अबाधित आहे. बेन हर सिनेमाने मला हॉलिवूड सिनेमांकडे आकर्षित केले.. आणि एक प्रेम कहाणीची सुरवात झाली..माझी व हॉलीवूडची. त्यासाठी मी ‘बेन हर’ चा कायम आभारी राहीन.

खाली या थीमच्या काही लिंक्स देत आहे

१. जगप्रसिद्ध जॉन विल्सन ऑर्केस्ट्रा ने बीबीसी प्रॉम्स मधे ही जवळजवळ नउ मिनीटांची जबरदस्त सिंफनी व ‘बेन हर थिम’ एकदा पूर्ण ऐका. जमले तर डोळे मिटून घ्या. पैजेवर सांगतो की तुम्ही सिनेमा तुमच्या लहाणपणी जरी पाहिला असेल तर हे संगीत ऐकून तुम्हाला काही गोष्टी तरी नक्की आठवतील. अपून का चॅलेंज है. ही थीम ऐकताना तुम्हाला कोणते सीन आठवतात ते कमेंट्समधे नक्की लिहा.

https://youtu.be/ueS07YbMeUw

२. स्वतः मिल्कस रोजा ने कंडक्ट केलेला ऑर्केस्ट्रा ‘बेन हर’ ची थीम वाजवत आहे. स्वतः निर्मात्याची रचना त्याच्याच दिग्दर्शनाखाली ऐकण्याचे भाग्य खूप कमी लाभते. या व्हिडिओमुळे आपल्यालाही ते लाभलय. नक्की पहा व आनंद घ्या.

https://youtu.be/9L_z2OcL8-U

३. Rowing of the Galley Slaves- ज्यू विद्रोहींना रोमन सैनिक जहाज चालवायला वापरतात तो जबरदस्त सिन. यातले जहाजाच्या वाढणाऱ्या वेगासोबत अंगावर येणारे संगीत व सीन मधे चार्लटन चे खुन्नस देणारे विद्रोही डोळे शेवटपर्यंत नक्की पहा.

https://youtu.be/ax7wcShvrus

४. जिजस अर्थात येशू, बेन हर ला प्रेमाने पाणी पाजतो तो अतिशय प्रभावी सीन. यातले करुण संगीत तुमचे मन विदिर्ण करेल हे नक्की.

https://youtu.be/tVlf7OiiTJE

— सुनील गोबुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..