आम्ही व्यसनमुक्ती केंद्रात नेमके काय करतो ?…एका व्यसनीला व्यसनातून बाहेर पडण्यास इच्छाशक्ती देण्यासाठी नेमके काय उपचार होतात ? याबाबत अनेकांना कुतूहल असते तसेच ..व्यसनमुक्ती केंद्राबाबत अनेक गैरसमज देखील असतात ..तेथे मारतात ..टाॅर्चर करतात ..पोटभर जेवण मिळत नाही वगैरे गैरसमज आहेत ..माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे ..ही लेखमला मागील वर्षी फेसबुकवर लिहिली होती ..मात्र ज्यांनी वाचली नसेल त्यांच्यासाठी पुन्हा ही लेखमाला येथे आज पासून टाकायला सुरवात करत आहे ..
यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी !
कृपया ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून आपण व्यसनमुक्तीच्या चळवळीला हातभार लावावा ही विनंती !
Leave a Reply