भाग्यरेषा तळहाती आज या उमलावी
पैलतीर येता, साद त्या राघवाची यावी।।धृ।।
घरटयात सुखाच्या, ओढ़ प्रीतीची असावी
स्पर्शता निष्पाप प्रीती, वेदना उरिची हसावी
कण कधी अमृताचेही, ओघळावे आसवी।।१।।
जीवनी उनसावल्यांचा, खेळ नित्य चाले
सागरी भरती – ओहोटी, भिजते चांदणे
अंधारताच वाट त्या दिनकराची दिसावी ।।२।।
थैमान वादळी छळते, कधी नीरव नीरवता
शीणतो जीव क्षणी, कधी चंदनी शीतलता
भोगिले भोग सारे, ईछ्या काय ती उरावी ।।३।।
आता नाही, काहीच याचना या जीवनी
एकच भाग्यरेषा, तळहाती या उमलावी
पैलतीर येता, साद त्या राघवाची यावी ।।४।।
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०८.
९ – ४ – २०२२
Leave a Reply