नवीन लेखन...

भक्ती बर्वे-इनामदार आणि जया भादुरी-बच्चन

भक्ती बर्वे -इनामदार आणि जया भादुरी -बच्चन यांच्यात एरवी वरवरचे एकच साम्य वाटेल -दोघीही माहेर -सासरचे आडनांव लावतात. फारतर दोघीही उच्च प्रतीच्या अभिनेत्री ! पण त्या दोघींमधील गुह्य एका हृद्य प्रसंगाने अनुभवले.
मागील आठवडयात एक्सप्रेस हाय -वे ने मुंबईला जात असता “फुलराणी -भक्ती बर्वे “हा बोर्ड असलेला बोगदा लागला. आणि भक्तीचा अपघाती मृत्यू आठवला. वाईचा कार्यक्रम आटोपून ती व्हाया बालगंधर्व (पुणे) रात्री टॅक्सीने मुंबईला जात होती. पहाटे दुर्देवी अपघातात तिचे जागीच निधन झाले. अवघे चित्र -नाटय विश्व हळहळले. तिची अकाली exit माझ्यासारख्या तिच्या असंख्य रसिकांना हेलावून गेली.
मी त्यावेळी मुंबईत नोकरीला होतो. एका सकाळी वर्तमानपत्रात दादर -माटुंगा कल्चरल सेन्टर मध्ये तिच्यासाठी आयोजित केलेल्या शोकसभेचे वृत्त वाचनात आले. मी गेलो.
मराठी चित्र -नाटय सृष्टीतील तिचे बहुतांशी सहकारी तिला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. रंगमंचावर तिचा नेहेमीचे मिश्किल हास्य असणारा फोटो मधोमध ठेवला होता. अफाट गर्दी होती. स्टेजवरील एक श्वेतवसना स्त्री काही केल्या ओळखू येत नव्हती. बाकीच्या कलावंतांची भाषणे झाली -आठवणी share झाल्या. अचानक निवेदकाने नांव पुकारले -“श्रीमती जया बच्चन” ! मी थरारलो. पण तरीही तिच्या उपस्थितीचे प्रयोजन कळेना. क्षणभर वाटले, हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ती आली असावी.
शांतपणे ती माइकजवळ गेली. पुढील दहा मिनिटे अत्यंत उत्कट आणि संयत स्वरात तिने स्वतःचे आणि भक्तीचे व्यक्तिगत भावबंध उलगडले. त्यांची मैत्री ,रंगमंचाची बांधिलकी, समाजकार्य, भक्तीचे बच्चन कुटुंबाशी असलेले गहिरे नाते असे असंख्य आणि अज्ञात धागेदोरे जयाने ऐकविले. घाव पचविल्याचा पण त्याचवेळी जखमी झालेला जयाचा आवाज आजही कानात भरून राहिला आहे. “गुड्डी ” पासून अलीकडचा “लागा चुनरीमे दाग ” असा जयाचा अभिजात चित्रप्रवास (अपवाद फक्त “जवानी -दिवानी “मधील कॉलेज -गर्लचा) मी साक्षीभावाने अनुभवाला आहे. पण त्यादिवशी ती फक्त एक मैत्रीण होती -दुसऱ्या जिवाभावाच्या मैत्रिणीच्या निधनाने आहत झालेली आणि विनासंकोच मराठी मंडळीत विरघळून गेलेली !
म्हणूनच कधी कधी स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटतो- पण माझ्या या अनुभवासाठी भक्तीला “जावे लागले.”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..