भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांचा जन्म २१ डिसेंबर १९०३ रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झाला.
आबासाहेब गरवारे यांना महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार म्हणून मानले जाते. गरवारे उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. शून्यातून उद्योग सुरू करून त्यांनी गरवारे मोटर्स, गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन, गरवारे वॉल रोप्स अशा अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. त्यामुळे प्लॅस्टिक्स, नायलॉन ब्रिसल्स इ. गोष्टींची आयात बंद करता आली.
१९५९ मध्ये त्यांची मुबईचे शेरीफ म्हणून नेमणूक झाली होती.
आज सुद्धा गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, या कंपन्या भारतातील अग्रगण्य मानल्या जातात.
१९७१ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले, व पोस्ट तिकीट प्रकाशीत केले.
आबासाहेब गरवारे यांचे २ नोव्हेबर १९९० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply