भालचंद्र नेमाडे यांचे उच्च शिक्षण, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून, व डेक्कन कॉलेजातून झाले. नंतर त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले. नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे. त्यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी सांगवी, खानदेश येथे झाला. १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात व शेवटी ते मुबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले. नेमाडे हे गोवा विद्यापीठातही इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख होते.
‘कोसला’ हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते… ‘ भालचंद्र वनाजी नेमाडे यांच्या कोसला’ या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता. कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार (१९६७), जरीला (१९७७) व झूल(१९७९) या “चांगदेव पाटील” या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबर्यार लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली. कादंबर्यां्शिवाय त्यांचे ‘देखणी’ आणि ‘मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत. टीकास्वयंवर या टीकाशास्त्रावरच्या पुस्तकासाठी नेमाडे यांना १९९० साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच २०१३ साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कारही त्यांना देण्यात आला. नेमाडेंनी कादंबरी, कविता व समीक्षा ग्रंथांची निर्मिती या सर्व क्षेत्रांत साहित्यिक कामगिरी केली.
रंजनवादी मूल्यांना कडाडून विरोध करतानाच परंपरेविषयी चिकित्सक असण्याकडे त्यांचा कल आहे. मराठीवरील इंग्रजी साहित्याचा प्रभाव, शैलीशास्त्रीय दृष्टीने अभ्यास ही वैशिष्ट्ये असणार्याल नेमाडेंनी इंग्रजीतूनही साहित्यनिर्मिती केली. “साहित्याची भाषा‘ हे त्यांचे भाषाविज्ञानविषयक तात्त्विक स्वरूपाचे पुस्तक वाचकांना वेगळी दृष्टी देते.
नेमाडेंनी आपल्या साहित्यात बोलीभाषेला अधिकाधिक वाव दिला. कोकणी, गोंयची, हिंदीमिश्रित उर्दू आणि वैदर्भीय या बोलींमध्ये त्यांनी कविता लिहिल्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ विकिपीडिया.
Leave a Reply