नवीन लेखन...

‘तांबड्या माती’तील साधा माणूस भालजी पेंढारकर

भालजींनी काही काळ पुण्यातील केसरी वृत्तपत्रात नोकरी केली. ते नाटकाकडे वळले व जवळ जवळ सहा नाटके त्यांनी लिहिली तसंच नाटकात कामही केले. याच दरम्यान भालजींनी कोल्हापूर येथील महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी काम सुरू केले. त्यांचा जन्म २ मे १८९८ रोजी झाला. एका चित्रपटासाठी त्यांनी लेखनही केले; पण दुर्दैवाने तो चित्रपट पडद्यावर आला नाही. तेथून ते बाहेर पडले. तोरणे आणि पै यांच्यासोबत त्यांनी “पृथ्वीवल्लभ’ चित्रपटाची योजना आखली. याचे पटकथालेखन आणि रंगभूषा व अभिनयही केला. हा चित्रपट लोकप्रिय झाला आणि बाबांना पटकथा लेखनाचे काम वाढले. पण भालजीना दिग्दर्शक व्हायचे होते.

श्याबमसुंदर, महारथी कर्ण, कालियामर्दन, सावित्री, नेताजी पालकर, जयभवानी, पावनखिंड यांसारखे एकापेक्षा एक सरस चित्रपट भालजीनी दिले. १९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा कोल्हापूर येथील ‘जयप्रभा’ स्टुडिओ जाळला गेला. चित्रपटांची संपूर्ण आघाडी सांभाळणारे भालजी पेंढारकर यांची वाटचाल अगदी सहजसोपी अशी झाली नाही. नव्याने तयार केलेला ‘मीठभाकर’ , ‘मेरे लाल’ हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले.पण भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून ‘जयप्रभा’ स परत उभे केले. जिद्दीतून ‘मीठभाकर’ व ‘मेरे लाल’ ची पुनर्निर्मिती केली व मीठ भाकरने चांगला व्यवसाय देखील केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस वेग मिळवून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतून लाचारी विरुद्ध शाद्बिक आसूड संवादातून ओढले. ‘शिवकाळ’ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती.

भालजीं पेंढारकारांचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी संस्था होती. या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत, सूर्यकांत, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. भालजी पेंढारकरांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानासाठी अनेक पुरस्कारांने त्यांना सन्मानीत करण्यात आलं यामध्ये ‘तांबडी माती’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद या विभागात राष्ट्रीय पारितोषिक, चित्रभूषणजीवन गौरव, ग.दि.मा. पुरस्कार, तसंच १९९१ साली भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा व सर्वोच्च अश्या दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. कलेची साधना अगदी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम निभावली आणि “साधा माणूस” ही स्वत:ची ओळख नेहमी जपली. भालजी पेंढारकर यांचे उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “थोरातांची कमळा”, “तांबडी माती”, “साधी माणसं”, “मराठा तितुका मेळवावा”, “छत्रपती शिवाजी’, “मोहित्यांची मंजुळा”, “घरची राणी’, “स्वराज्याचा शिलेदार”, “कांचनगंगा” ,”महाराणी येसुबाई” ,”बाल शिवाजी”, “प्रीत तुझी माझी” आणि “शिलंगणाचे सोने’.
भालजी पेंढारकर यांचे २६ नोव्हेंबर १९९४ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..