नवीन लेखन...

सुपर स्टार अभिनेते भरत जाधव

मराठीतील किंग ऑफ कॉमेडी पर्सन व मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव यांचा जन्म १२ डिसेंबर १९७३ रोजी झाला.

भरत जाधव हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. भरत जाधवचा जन्म लालबाग – परळ परिसरात झाला. तिथेच भरत जाधवचं बालपण गेले. भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली “लोकधारा” मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली.

भरत जाधव यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत जवळपास ८५ चित्रपट, आठ दूरचित्रवाणी मालिका केल्या तरी नाटकांमुळे ते अधिक लक्षात राहिला आहेत. गिरणी कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे सीरियस ‘अधांतर’ नाटक असो किंवा ‘ऑल द बेस्ट’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘ढॅण्ट ढॅण’ आणि ‘सही रे सही’ ही कॉमेडी नाटके. भरत जाधव यांची भूमिका नेहमीच ‘फ्रेश’ वाटली. पूर्वीचे ‘सही रे सही’ आणि आताचे ‘पुन्हा सही रे सही’ नाटक त्याच्या नाटय़ कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरले. या नाटकाचे हजारो प्रयोग झालेत.

तब्बल १५ वर्षे हे नाटक सलगपणे सुरू आहे. ‘सही रे सही’ या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते. त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. ‘सही रे सही’ या नाटकाचे ‘अमे लई गया, तमे रही गया’ या नावाने गुजराती भाषेत प्रयोग झाले. त्यात शर्मन जोशीने प्रमुख भूमिका केली होती. गुजराती ‘सही रे सही’ नाटकाचे २० महिन्यांत ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग होणे, हे गुजराती रंगभूमीवर प्रथम घडले होते.

‘सही रे सही’ नाटकाचे ‘हम ले गये, तुम रह गये’ या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरीने प्रमुख भूमिका साकारली होती. भरत जाधव निर्मिती क्षेत्रात असून ‘भरत जाधव एन्टरटेन्मेंट’ या नावाने कार्यरत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बॉलीवूडइतकी श्रीमंत नसली तरी मराठीतला सुपस्टार भरत जाधवने सर्वप्रथम स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन विकत घेऊन आद्य नटाचा मान मिळवला आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

भरत जाधव यांची प्रमुख नाटके- सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, ऑल द बेस्ट, आमच्या सारखे आम्हीच
भरत जाधव यांची चित्रपट- श्रीमंत दामोदर पंत, खो खो, फेकमफाक, नो एंट्री पुढे धोका आहे, डावपेच, क्षणभर विश्रांती, रिंगा रिंगा, शिक्षणाच्या आयचा घो, जावई बापू जिंदाबाद, गलगले निघाले, साडे माडे तीन, मुंबईचा डबेवाला, मुक्काम पोस्ट लंडन, हय़ांचा काही नेम नाही, बकुळा नामदेव घोटाळे, नाना मामा, माझा नवरा तुझी बायको, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, चालू नवरा भोळी बायको, जत्रा, खबरदार, पछाडलेला, सरीवर सरी, हाऊसफुल्ल, नव-याची कमाल, बायकोची धमाल, खतरनाक, वास्तव, हसा चकटफू.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..