भारत भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते डॉक्टर स्नेहल तावरे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात संतांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे संतांचे योगदान आणि संत साहित्याची समीक्षा या डॉक्टर नीला पांढरे यांच्या लेखाने या पुस्तकाचा प्रारंभ होतो संत नामदेव तुकाराम ज्ञानदेव एकनाथ चोखोबा आदी संतांचे विचार विविध लेखांमधून समजतात संत कवयित्रींच्या स्त्री संवेदना संतांचे प्रादेशिक भाषेतील योगदान ग्राहक संरक्षणार्थ संतांचे योगदान भारतीय संत आणि जागतिकीकरण असे वैशिष्ट्यपूर्ण विषयही पुस्तकात हाताळले आहेत संत कबीर यांची महती किंवा जैन संतांच्या कार्यावर ही भाष्य करण्यात आलेला आहे डॉक्टर शिवाजीराव मोहिते डॉक्टर शोभा इंगवले डॉक्टर जयश्री रणनवरे डॉक्टर मार्तंड कुलकर्णी आदींनी लेखन केला आहे
Language: मराठी
Author: डॉ. स्नेहल तावरे
Category: संत साहित्य, आध्यात्मिक
Publication: स्नेहवर्धन प्रकाशन
Pages: 300
Weight: 340 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789380321950
Leave a Reply