ह्या ब्रम्हांडात अगदी सगळं आहे आणि ते विपूल प्रमाणात आहे, फक्त आपल्याला त्या शक्ती पर्यंत पोचता यायला हवं, असं अगदी आपलं अध्यात्म पण सांगत आणि आत्ताचे तत्ववेष्टे सुद्धा हेच सांगतात. जेव्हा सगळ्या शक्ती एकवटून एकाच दिशेने प्रयत्न करतात तेव्हा विजय नक्की असतो. भारताच्या स्वातंत्र्याबाबत सुद्धा असेच झाले असेल असे आता इतिहासाची पाने चाळतांना जाणवतं. कोणी भारतात प्रयत्न केला, तर कोणी भारतीयांनी भारता बाहेर प्रयत्न केला, कोणी अनिवासी भारतीयांनी भारतात येणे पसंद केले तसेच काही विदेशी शक्ती सुद्धा आपल्या बाजूने झाल्या, ह्या सगळ्यांची एकवटलेल्या विविध प्रयत्नांचे फलस्वरूप म्हणजे आपल्या भारतमातेची पारतंत्र्यातून झालेली मुक्तता. भारतमातेची वीरांगना मीरा बहन.
ब्रिटिश सेनेचे अधिकारी (रिअर अडमिरल) सर एडमंड स्लेड ह्यांच्याकडे २२ नोव्हेम्बर १८९२ साली एक तेजस्वी शलाका जन्माला आली मैडलीन स्लेड. मनाने त्या प्रकृती प्रेमी आणि प्राणी प्रेमी होत्या. त्याच बरोबरीने गाण्या विषयी सुद्धा अतिशय प्रेम होतं. बीथोवेन ह्यांचेच गाणं ऐकत त्या मोठ्या झाल्या. पुढे त्या अश्या संगीत समारोहाच्या आयोजक बनल्या. आयुष्य त्याच्या गतीने पुढे जात होते, मनाजोगते काम होते, म्हंटल तर समाधानी आयुष्य. पण कधीतरी एखादे वळण आयुष्यला कलाटणी देणारे ठरते. मैडलीन ह्यांच्या आयुष्यात ते वळण रोमेन रॉलंड ह्यांनी लिहिलेले गांधीजींचे पुस्तक ठरलं. गांधीजींच्या विचारांनी त्या प्रभावित झाल्या आणि भारतात यायला तयार झाल्या. गांधीजींना पत्र पाठवून त्यांची परवानगी मागितली, गांधीजींनी इथल्या आयुष्याची त्यांना कल्पना दिली, पण मैडलीन ह्यांचा ईरादा पक्का होता.
७ नोव्हेम्बर १९२५ साली त्या भारतात आल्या, त्यांना घ्यायला सरदार वल्लभाई पटेल, महादेव देसाई आणि स्वामी आनंद गेले होते. इथे आल्यावर त्या हिंदी भाषा शिकल्या, भगवद्गीता शिकल्या, आणि गांधीजींच्या आश्रमाची पूर्ण कार्यपद्धती स्वीकारली, मैडलीन च्या मीरा बहन झाल्या, स्वाभाविकच आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचासुद्धा त्या हिस्सा बनल्या. तत्पूर्वी १९३१ साली लंडन ला झालेल्या गोलमेज परिषदेच्या त्या हिस्सा बनल्या. १९३१ साली असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला परिणामी दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्यातून बाहेर आल्यावर त्यांनी भारताची बाजू इतर देशांसमोर मांडायला सुरवात केली.
सेवाग्राम इथल्या आश्रमाच्या स्थापनेत सुद्धा त्यांचे सहकार्य मोठे आहे. १९४२ च्या चले जाव चळवळीत त्यांनी नेतृत्व केले आणि गांधीजीं बरोबर आगा खान पॅलेस पुणे येथे १९४४ पर्यंत बंदिस्त राहिल्या.
भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर त्या रुरकी, ऋषिकेश अशा सगळ्या ठिकाणी आश्रमांची स्थापना करत भारत भ्रमण करत राहिल्या. भारतातील विविध ठिकाणच्या जंगल तोडी विरुद्ध त्या लिहीत राहिल्या, बोलत राहिल्या. Something wrong in Himalayas हा त्यांचा जंगलतोडी विषयातील शोध निबंध प्रसिद्ध आहे.
१९५९ साली त्या इंग्लड ला परत गेल्या पुढे १९६० साली बिथोवेन ह्यांच्या asutria ला गेल्या आणि तिथेच आयुष्याची उर्वरित २२ वर्ष घालवली. २० जुलै
१९८२ वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या एकवर्षं आधी १९८१ साली त्यांना पद्म विभूषण ह्या दुसऱ्या उच्च भारतीय सन्मानाने गौरविण्यात आले.
आपल्या जीवनाची ३४ वर्ष भारतभूमीला देणाऱ्या ह्या तेजस्वी शलकेला माझे कोटी कोटी प्रणाम.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
३०/०७/२०२२
संदर्भ:
१. http://xn--e4b.bharatdiscovery.org/
२. amritmahotsav.nic.in
३. http://xn--g4b.britannica.com/
४. http://xn--h4b.inuth.com/
५. Wikipedia.org
Leave a Reply