आज आकाशवाणीवरून पहिल्यांदा बातम्या प्रसारित झाल्या त्या घटनेला ९४ वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने भारतीय प्रसारण दिवस साजरा केला जातो.
रेडिओ क्लब ऑफ इंडिया, इंडियन ब्रॉडकास्टिग कंपनी, ऑल इंडिया रेडिओ, इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉपरेरेशन ऑफ इंडिया आणि आता प्रसार भारती ही स्वायत्त संस्था असा आकाशवाणीचा गेल्या ९० वर्षांचा रोमांचकारी प्रवास झाला आहे.
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन आकाशवाणी माध्यम मनोरंजन आणि प्रबोधन या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी काम करीत आहे. रेडिओ क्लब ऑफ इंडियातर्फे २३ जुलै १९२७ रोजी आकाशवाणी मुंबई केंद्रावरून पहिले बातमीपत्र इंग्रजीतून प्रसारित झाले होते. त्या काळी आकाशवाणी माध्यमाविषयी सर्वाना कुतूहल आणि नावीन्य होते. संस्थात्मक उभारणीअभावी २३ ते २७ जुलै असे प्रारंभीचे पाच दिवस अनौपचारिकपणे बातम्यांचे प्रसारण झाले होते. बातम्यांचे प्रसारण हे वैशिष्टय़ ध्यानात घेऊन दरवर्षी २३ जुलै हा दिवस भारतीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो. प्रारंभीच्या काळात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीची मुंबई आणि कलकत्ता अशी आकाशवाणीची दोनच केंद्र होती.
तत्कालीन ब्रिटिश सरकारने १९३० मध्ये ही कंपनी ताब्यात घेतली. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉपरेरेशनच्या (बीबीसी) धर्तीवर ब्रॉडकास्टिंग कॉपरेरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply