नवीन लेखन...

भारतीय वैज्ञानिक

गौरवशाली प्रगत संशोधन करणारे भारतीय वैज्ञानिक अनेक शतके भारत विविध आक्रमणांना तोंड देत राहिल्याने या देशात औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली स्थिरता आणि शांतता नव्हती. सतत लढाया, अशांतता होती. यामुळे मधल्या काळात येथे संशोधनासाठी पूरक वातावरण निर्माण होऊ शकले नाही. मात्र तरीही वैदिक काळात व नंतरही भारतात विविध विषयांवर संशोधन झाले होते. त्याकाळी व त्यानतर भारताने संशोधन क्षेत्रात केलेल्या गौरवशाली प्रगतीची ओळख करून देणारे काही साहित्य जाणीवपूर्वक प्रकाशित होत असते. नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले डॉ. मधुकर आपटे यांचे ङ्गभारतीय वैज्ञानिकङ्घ हे पुस्तक अशाच प्रकारातील आहे.

या पुस्तकाबाबत उल्लेखनीय बाब म्हणजे जुन्या काळात झालेल्या वैज्ञानिक प्रगतीची माहिती मोघम व अस्पष्ट नसून थोडक्यात पण अतिशय मुद्देसूद आहे.

उदाहरणार्थ- ङ्गप्राचीन भारतीय खगोलविद आर्यभट्टङ्ख मध्ये आर्यभट्टांनी पृथ्वीचा परिध मोजण्याबाबत व पृथ्वीवरील नाक्षत्र दिनाचा (डळवशीशरश्र ऊरू) काळ काढण्याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती देताना नमूद केले आहे की-

ङ्गआर्यभट्टांनी पृथ्वीचा परिध मोजण्याची पद्धत सांगून पृथ्वीचा परिध 24,835 मैल असल्याचे सांगितले. हा आकडा आधुनिक पद्धतीने पृथ्वीचा परिध काढून सर्वत्र मान्यताप्राप्त पृथ्वीच्या परिघापेक्षा (24,902 मैल) फक्त 0.2 टक्के कमी आहे.

आर्यभट्टांनी त्यांच्या गणिताने पृथ्वीवरील नाक्षत्र दिनाचा काळ 23 तास 56 मिनिटे 4.1 सेकंद ठरविला होता. त्याचा आधुनिक काळ 23 तास 56 मिनिटे 4.01 असल्याचे पाहून आर्यभट्टांच्या गणितातील अचूकता जाणवते. तसेच त्यांनी ठरविलेल्या नाक्षत्र वर्षाच्या काळात सध्याच्या मान्यताप्राप्त काळाच्या तुलनेत फक्त 3 मिनिटे 20 सेकंदाची चूक दिसते.

ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध शल्यविशारद सुश्रुत यांच्याबाबतच्या माहितीत म्हटले आहे की, त्यांच्या ङ्गसुश्रुत संहिताङ्ख या संस्कृत ग्रंथात 184 प्रकरणे असून त्यात 1120 आजारांची वर्णने आहेत. यात 120 प्रकरणात शस्त्रक्रियेची सविस्तर माहिती, इतर 64 प्रकरणात औषधांची माहिती आहे. तसेच औषधात वापरल्या जाणाऱ्या 700 वनस्पती, 64 खनिज आणि 57 प्राण्यांचीही सविस्तर माहिती आहे.

शस्त्रक्रियेचे आठ प्रकार, पट्टीबंधनाचे (इरपवरसशी) चौदा प्रकार आणि शस्त्रक्रियेच्या शंभराहून जास्त उपकरणांचे वर्णनही “सुश्रुत संहितेत आहे.”

पुस्तकातील सर्वच लिखाण असेच शास्त्र व आधार यांना धरून लिहिलेले आहे. या पुस्तकात खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट, वैद्यक शास्त्राचे सुश्रुत यांच्याशिवाय चरक, नागार्जुन, अणुसंकल्पनेचे जनक कणाद, गणितज्ज्ञ भास्काराचार्य या प्राचीन काळातील संशोधकांसोबतच आधुनिक काळात विविध क्षेत्रात संशोधक म्हणून मान्यताप्राप्त भारतीय संशोधक डॉ. जगदीशचंद्र बोस, सर सी. व्ही. रमण, श्रीनिवास रामानुजम, होमी भाभा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. जयंत नारळीकर अशा एकूण 25 संशोधकांचे जीवन आणि कार्य याबद्दल सखोल, सविस्तर व सचित्र माहिती आहे.

पुस्तकाची भाषा गोष्ट सांगण्यासारखी सोपी आणि सहज समजणारी आहे.

नचिकेत प्रकाशनाची अंतरबाह्य दर्जेदार निर्मिती आहे. मुखपृष्ठही कल्पक व आकर्षक झाले आहे. नव्या पिढीला वाचनाची सवय लागावी असा विचार गेल्या काही वर्षात जोर धरू लागला आहे. त्यात मुलांना वाढदिवस, मौंज किंवा सत्कार प्रसंगी पुस्तके भेट देण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्या भेट देण्याच्या पुस्तकांमध्ये ङ्गभारतीय वैज्ञानिकङ्घचा समावेश आवर्जून करायला हवा. उत्तम पुस्तकनिर्मितीसाठी लेखक व प्रकाशक दोघाचेही अभिनंदन.

नचिकेत प्रकाशन, नागपूर. 1 विकास कुळकर्णी

(पृ. 112 / किंमत 100 रुपये)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..