घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी ।।धृ।।
वास्तुकला सुंदर रंग त्याचे बहारदार
आकर्षक वाटणार परी निवड करा जपुनी,
घ्याहो निरखूनी ।।१।।
ही घरे भावनांची त्यांत छटा विचारांची
भर पडतां श्रद्धेची जीवन जाईल तसेंच होऊनी,
घ्याहो निरखूनी ।।२।।
राग लोभ अहंकार मद मत्सर हे विकार
ह्यांची ती घरे असणार शोधा विचार करुनी,
घ्याहो निरखूनी ।।३।।
दया क्षमा शांति प्रेम आनंद उल्हासती
आदर भावांची वसती विवेक बुद्धीने शोधा जाणूनी,
घ्याहो निरखूनी ।।४।।
प्रत्येक शोधतो आपले घर तसेच करी जीवन साकार
सुख दुःखाची फळे घेणार हीच जीवनाची खरी कहाणी,
घ्याहो निरखूनी ।।५।।
घरें बांधली निरनीराळी घ्याहो निरखूनी
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply