भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे,
तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१,
भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग,
बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२
आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास,
आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३
इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी
तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी…४
काही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून
विचार मात्र मिश्कीलतेनें, हसती पश्चाताप बघून…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply