नवीन लेखन...

भय अजून संपत नाही

आता हळूहळू पूर्ववत शाळा सुरू होत आहेत. तेवीस तारखेला नातवाची शाळा सुरू झाली आहे. आदल्या दिवशी शाळेत जाण्याची तयारी करतानांच सून बाई त्याला काही सूचना देत होत्या. आणि तो काहीही बोलत नव्हता वाटले होते की दोन वर्षे घरात असल्याने त्याला काही तरी सांगायच होत. तो म्हणाला की मी हे सगळे नियम पाळतो पण….. पण काय तर म्हणाला की मला चार गोष्टींचे दडपण आले आहे….

१)माझे मित्र मला बोलतील का.

२)टिचर मला ओळखतील का.

३)मला रागवतील का.

४)पहिल्या सारखे आम्ही मित्र मजा करु शकतो का…

आता हे सगळे प्रश्न भिती पोटीच निर्माण झाले असतील. ऑनलाईन शिक्षण चालू होते तेव्हा या गोष्टींना मुकलेले विद्यार्थी असेच विचार करत असतील असे मला वाटते. घरातील एका ठिकाणी बसून मोबाईल वर बसून शिकणे. थोडा वेळ झाला की काही तरी खाणे. थोडे उशिरा उठणे. घरातील लोकांबरोबर जेवणे. अभ्यास करणे. लिहिणे. आणि बऱ्याच गोष्टी करतांना काही तरी सांगायच होत त्याला पण तो बोलत नव्हता. पहिल्या दिवशी शाळेतून आल्यावर थोडा खुष होता पण भरभरून बोलत नव्हता. आणि शाळेचे वाहन पण नाही आईच्या मागे गाडीवर बसून जात आहे. एक महिना जेमतेम शाळा असेल. मात्र पुढील वर्षी हे वातावरण पूर्वी सारखे व्हावे अशी मनापासून इच्छा आहे तोपर्यंत हे भय संपणार नाही…

काय दिवस आले आहेत पहा मला फारसे आठवत नाही पण माझी मोठी बहीण इयत्ता सातवीत असताना त्यावेळी रझाकारांची भिती होती म्हणून मुलीसाठी एक छकडा होता घरासमोर छकडा आला की दोन्ही बाजूला पडद्याचा आडोसा करून मुली घरातून छकड्यात बसल्या की पडदा लावला जायचा. परत शाळा सुटली की हेच.काळ बदलला चाळीतील मुलं. गल्लीतील मुल. खेडेगावात राहणारी मुलं एकमेकांना बोलावत मिळून मिसळून गप्पा मारत शाळेत जात असत. मोकळे वातावरण होते म्हणून ना मुलांना भय ना घरच्यांना भय. त्यामुळे ते दिवस आनंदाचे अजूनही आठवतात. आता सगळेच चित्र बदलले आहे. भय कशाकशाचे यादी मोठी आहे. मुलांना शाळा आवडते पण भय इथले संपत नाही….

— सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..