1978 पासून रेल्वे मध्ये काम करीत असताना अनेक गमतीजमती झाल्या होत्या. खरंतर जवळून पाहिलेली रेल्वे या विषयावर काही कथा लिहिल्या आहेत. काही जण म्हणतातवाचलयशिवायलिहीतायेतनाही. हे अगदी खरे आहे परंतु रेल्वे मध्ये काम करीत असताना समोर घडलेली गोष्ट. यामध्ये वास्तववाद असतो रेल्वेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याला पुस्तक वाचाय वेळ मिळेल असे काही सांगता येत नाही. कारण रेल्वे गाडी पास करण्यामध्ये रेल्वे कर्मचारी गर्क होऊन जातो. कारण जबाबदारीही फार मोठी असते शिवाय अनेक माणसांचे प्राण रेल्वे त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असतात. इंडियन रेल्वेचे जाळे अखंड भारतभर विखुरलेले आहे हे नाकारता येत नाही. जगामध्ये रेल्वे हे एक समुद्र आहे या समुद्राची रुंदी मोजणे कठीण आहे. असे हे प्रवासाचे व मालवाहतुकीचे एकमेव साधन होय. वडाप मध्ये किंवा एसटीमध्ये मापक जागा असते परंतु रेल्वेच्या डब्यामध्ये तशी भरपूर जागा असते. प्रवासी माणसांचा व्यवस्थित व चांगला प्रवास होण्यासाठी इंडियन रेल्वे प्रवाशांची व मालवाहतूक वस्तूंची फार काळजी करते. भरल्या संसारामध्ये एखाद्यावेळी एकांदा मुलगा घरी वेळेवर आला नाही तर. आई म्हणते माझा बाळ अजून आला नाही स्वतःच्या आईप्रमाणेच रेल्वे सुद्धा अशीच काळजी करते. इंडियन रेल्वे ही सर्वांची आई आहे आई मुलाला भाकरी चा गोड घास खायला देते अशीही रेल्वे माय माऊली आहे. या रेल्वेच्या आशीर्वादाने अनेक माणसांचे कुटुंब आज रोजी सुखी आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
… रेल्वे ही शेपटी प्रमाणे काम करत असते म्हणूनच मालगाडी असो. एक्सप्रेस गाडी असो किंवा पॅसेंजर गाडी असो अशा गाड्या शेपटी प्रमाणे जात येत असतात. रेल्वे चालवणे ही फार मोठी जबाबदारी आहे डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. तेव्हाच ही रेल्वे रुळावरून व्यवस्थित जाते रेल्वे कामामध्ये व्यवस्थित काम केले तर याचा फायदा सर्वांनाच होतो. म्हणूनच भारतीय रेल्वे ही फार मोठी आहे यामध्ये प्रवास करणारे श्रीमंता पासून गरिबा पर्यंत माणसे प्रवास करतात. माणसांच्या जिवाला किंवा मालवाहतूकिला दगा किंवा अपघात होऊ नये ही काळजी सरकारने घेऊन. हे प्रवासाचे साधन निर्माण केले आहे हे नाकारता येत नाही…।
… रेल्वे म्हंटले तर बारा बलूत समाज रेल्वे मध्ये काम करतो. रेल्वेमध्ये काम करणारी माणसं ही आपलीच आहेत. प्रत्येक माणसाचा स्वभाव गुण अलक अलक असेल यात वाद नाही. परंतु माणूस हा इथून तिथून एकच आहे. रेल्वेमध्ये कष्टाचे काम करणारे ट्रॅकमन यांची काम रेल्वेमध्ये अतिशय कष्टाचे आहे. तरीसुद्धा इंडियन रेल्वेने ट्रॅक वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कधी नाराज केले नाही. आणि रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला रेल्वे पुष्कळ मदत करते हे सुद्धा नाकारता येत नाही. कर्मचाऱ्याला मग तो कोणत्याही डिपार्टमेंटचा माणूस असो. त्याला वर्षातून तीन पास सिझन प्रमाणे कपडे पायात बूट रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांची फी. वर्षातून एकदा बोनस या सोनी इंडियन रेल्वेने केल्या आहेत. रेल्वेत काम करणे याला भाग्य असावे लागते ज्याच्या त्याच्या नशिबा प्रमाणे रेल्वे कामगार काम करीत आहेत.
,,, कशासाठी कशासाठी, एक वी त पोटासाठी. परंतु रेल्वेत काम करणारे काही कामगार छत्रपती आहेत. याचासुद्धा अभ्यास मी केला इंजीनियरिंग डिपार्टमेंट मधून एक गांगमन दहावी पास होता. त्याला रेल्वेने सुतार मिस्त्री म्हणून काही दिवस काम दिले. परंतु हा सुतार मिस्त्री डोक्याने कमी होता. त्याला पाच दिवस रजा हवी होती परंतु माणसे कमी असल्यामुळे त्याला रजा मिळाली नाही. म्हणून या सुतार मिस्त्री ने हातामध्ये करवत घेतली व ऑफिसच्या दिशेने जाऊ लागला. ऑफिस रणे मनात विचार केला हा माणूस बुद्धीने कमी आहे व डोक्यामध्ये काहीतरी विचार आहे. म्हणून ऑफिसर यांनी ऑफिसचे दार बंद केले. व फोन करून क्लार्कला सांगितले मी या माणसाची रजा मंजूर केली आहे…।
… असा हा भयभीत झालेला व ऑफिसर याना दहशत निर्माण करणारा सुतार मिस्त्री होय. दिवस पुढे पुढे जात होते. हाच सुतार मिस्त्री ट्राफिक डिपारमेंट मध्ये आला परंतु डोक्यावर परिणाम असल्यामुळे हा माणूस वेगळ्या स्वभावाने व स्वतःच्या चेहऱ्याने काम करीत होता. हाच मिस्त्री माझ्याबरोबर काही दिवस कराडमध्ये काम करत होता. याच मिस्तरी यांनी कधीतरी सिस्टर मॅरेज लोन काढले होते. त्याचे 50 टक्के लोन कम्प्लीट झाले नव्हते तरीसुद्धा या माणसाने कर्जासाठी रेल्वेकडे अर्ज केला होता. माझे लोन का आले नाही या विचारांमध्ये हा सुतार मिस्त्री पडला होता. या मिस्त्री च्या मनामध्ये काय आले हे मला समजले नाही. तरीपण हा मिस्त्री नवीन आपलिकेशन घेऊन हुबळी डिव्हिजन ऑफिसला गेला. व दोडमनी क्लार्क ला विचारले माझे लोन अजून पर्यंत आली नाही. क्लार्क म्हणाला तुमचे 50 टक्के लोन अजून पर्यंत फिटले नाही. यावर मिस्त्री म्हणाला डोळे झाकून काम करू नका तुम्ही मला नाही लोन दिली तर. पुढचे मी पाहून घेतो असे म्हणून मिस्त्री ने लोन फार्म क्लार्कच्या हाती दिला. वतो जाता झाला..।
….. क्रमश..।
दत्तात्रय पांडुरंग मानुगडे,
ग्रामीण कथा लेखक..।
Leave a Reply