माघ शुक्ल अष्टमीला भीमाष्टमी असे म्हणतात. या दिवशी भीष्माचार्यांनी प्राणत्याग केला असे सांगतात. भीष्माचार्य हे ब्रह्मचारी असल्याने त्यांचे तर्पण, श्राद्ध करण्यास कोणी नाही म्हणून सर्वांनी त्यांना आपले मानून तर्पण करावे ते या दिवशी. या तर्पणाने पापनाश होतो असे सांगितले आहे. या तर्पणाच्या निमित्ताने भीष्माचार्यांसंबंधी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply