नवीन लेखन...

भेटवावेसे वाटले म्हणून (उत्तरार्ध)

शायर हसन नईम म्हणतो ,
एक शायर था कि जागा रात भर
सारे अहमक़ सो गये आराम से।
मी गेल्यावर्षी वर्ल्डकपचा “भारत-पाकिस्तान” सामना पहायला मँचेस्टरला गेलो असतानाची गोष्ट. सामन्याच्या दिवशी पहाटे ३.३० वाजता ( अर्थात इंग्लंडच्या ) माझा मोबाईल खणाणला.
“सामंतसाहेब , गुडमॉर्निंग”…

…….वर्गावर आल्यावर आपल्या विद्यार्थ्यांना संबोधित करावे अशा प्रसन्न आवाजात प्रोफेसर अभिषेक निकम बोलत होते.
“बाहेर हवा कशी आहे ? मॅच होणार ना ?”………त्याने “यंदा पाऊस पडेल काय ?” असे नंदीबैलाला निरागसपणे विचारणाऱ्या प्रश्नकर्त्याच्या उत्साहात (मला) विचारले. मला खात्री आहे की स्पर्धेच्या आयोजकांनीदेखील इतक्या धुंद गुलाबी पहाटे त्या दिवशीचा वेदर रिपोर्ट घेतलेला नसावा. त्यादिवशीचा ( खिडकीचा पडदा बाजूला करुन ) हवामान अंदाज देणारा निःसंशय मी पहिला वार्ताहर होतो. त्यानंतर दिवसभर तो मला “मनसब” रेस्टोबारमधे ५५ मित्रांबरोबर चाललेल्या सेलिब्रेशनचे व सामन्याचे ‘लाइव्ह’ अपडेट्स देत होता. जणूकाही तोच स्टेडियमवर होता आणि मी ‘होम क्वारंटाईन’ होतो. मात्र पाकिस्तानी कर्णधार सर्फराज खानची विकेट गेल्यावर त्याने पाठविलेला “झिंगाट विजयोत्सव व्हिडिओ” इतका स्फोटक होता की तो फुल व्हॉल्यूममधे लावल्यावर माझ्या आजूबाजूचे स्थानिक गुजराथी प्रेक्षक त्या तालावरच नाचायला लागले आणि सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणारा के.एल.राहुल आवाज कोठून येतो आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षागारात अचंब्याने पाहू लागला,आणि हे मी मँचेस्टरच्या जिल्हा न्यायालयातदेखिल चंद्रकांत पाटीलांची शपथ घेऊन सांगेन.

त्याच्या मोदीप्रेमाविषयीदेखिल असेच काहीसे म्हणता येईल. ते प्रेम आंधळे असेल , एकांगी असेल , काहीसे टोकाचे आणि अनाकलनीयही असेल पण ते स्वार्थी , बेगडी आणि दिखाऊ आहे असे त्याच्या विचारधारेचे कट्टर विरोधक असलेले त्याचे जवळचे मित्रदेखील म्हणणार नाहीत. जी गोष्ट करायची ती आत्यंतिक मनापासून , आसुसून आणि स्वतःला पूर्ण झोकून देऊन , हा त्याचा स्थायीभावच आहे. त्याला आता इलाज नाही.२०१९च्या लोकसभेच्या मतमोजणीच्या दिवशी आम्ही जवळजवळ दिवसभर एकत्र होतो. भाजपाने ३०० जागांचा आकडा पार केल्यानंतरचे त्याच्या चेहेऱ्यावरचे बालसुलभ आनंदी भाव आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत.

इंग्लंडचा शैलीदार डावखुरा फलंदाज “गोल्डनबॉय” डेव्हिड गोवरच्या फलंदाजीचे वर्णन करताना कोणीतरी लिहिले आहे ….”His class is never in doubt , but his ability to stay on the ground is always in dark”.
शायर हमीद अल्मास म्हणतो ,
वो भी इन्सान है ऐ दिल उसे इल्जा़म न दे
जाने उसको भी किन आफ़ात ने घेरा होगा।

मध्यंतरी त्याची काही व्यावसायिक गणितं चुकली असं म्हणतात. मला सांगा, कोणाची चुकत नाहीत ? कागदावर १००% फुलप्रूफ वाटणारे व्यावसायिक हिशेब प्रत्यक्षात व्यवहारात तसेच्या तसे उतरविणारा एकतरी व्यावसायिक सांगा मला. मी खात्रीने सांगतो , एकही नाही. प्रत्येक व्यावसायिकाच्या आयुष्यात ही फेज कधी ना कधी येतेच.एकतर आधी किंवा नंतर. पण सुदैवाने त्यातून तो लवकरच सावरला आणि आम्हाला आमचा जुना प्रोफेसर मित्र परत दिसायला लागला. मध्यंतरी त्याचे त्याच्या विद्यार्थ्यांसोबतचे , येऊरच्या वृद्धाश्रमात तिथल्या वृद्धांबरोबर गातानाचे , हास्यविनोद करतानाचे व्हिडीओज् माझ्या पाहण्यात आले आणि मी निश्चिन्त झालो.

अभिषेक बदलला नव्हता. बदलणारही नव्हता. त्याला बदलवण्यासाठी नियतीला अजून किमान सात जन्म घ्यावे लागतील.
आम्हाला तो ‘ठाणेवैभव’ दैनिकाच्या जाहिरातीच्या पोस्टरवर दिसणारा , मॅरेथॉन धावणारा , विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच देशभक्तीचे व देशसेवेचे बाळकडू पाजणारा , स्वतः लिंबूसरबत पिऊन मित्रांसाठी थीम पार्ट्यांचे आयोजन करणारा , जिममधे सकाळी ७.४५ वाजता केक आणून मित्रांचे वाढदिवस साजरे करणारा व त्यांच्यासाठी पावणेदोन मिनिटांचे व्हिडीओज् बनविणारा ,देओल खानदानावर जिवापाड प्रेम करणारा , हिरीरीने मोदी प्रशासनाची खिंड लढविणारा आणि क्रिकेट व तंदुरुस्ती यांना आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग मानणारा प्रोफेसर अभिषेक निकम खूप खूप प्यारा आहे.
जीवनधर्माला असोशीने भिडणाऱ्या आमच्या या जिंदादिल मित्राने २५ एप्रिलला वयाची चाळीशी पार केली. त्याला तुम्हाला ‘भेटवावेसे’ वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.

वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी, अंगठीतला खडा लाभावा तसा अभिषेकसारखा मित्र लाभण्याचे भाग्य आयुष्यात किती जणांच्या वाट्याला येते ?
शायर दुष्यंत कुमार म्हणतो ,
सिर्फ शायर देखता है क़हक़हों की अस्लियत
हर किसी के पास तो ऐसी नज़र होगी नही ।

संदीप सामंत.
९८२०५२४५१०
२८/०४/२०२०.

Avatar
About संदीप सामंत 11 Articles
संदीप सामंत हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..