मधूर आवाज मिळूनी,
उपकार झाले तिजवर,
सुंदर गाणे गाऊनी,
आनंदीत करी इतर ।।१।।
हातपाय दुबळे होते,
दृष्टी नव्हती तिजला,
कष्ट करण्या शक्ति नव्हती,
कसा मिळेल घास तिला ।।२।।
परि ती होती आनंदी,
गाण्याच्या ओघांत,
उचलित होती पैसे,
पडता तिच्या पदरांत ।।३।।
जरी झाला देह दुर्बल,
जगण्याची होती आंस मनी,
मिळालेल्या आवाजाला,
समजे ती ऋणी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply