मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर
सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर //
हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला
कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला //
परी ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत
उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत //
जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी
मिळालेल्या आवाजाला, ऋणी समजे ती मनी //
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply