भारतीय राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी यांचा जन्म ४ सप्टेंबर १८२५ रोजी झाला.
दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक, जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते, भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते अशी त्यांची ओळख होती. शिक्षणानंतर ते प्राध्यापकाची नोकरी करत होते, नंतर उद्योग सुरु केला. त्यानंतर तो उद्योग बंद करून ते ब्रिटन मध्ये गेले व तिथे ही त्यांनी प्राध्यापकाची नोकरी केली तिथे ते गुजराथी शिकवायचे. आणि मग पहिले भारतीय जे खासदार म्हणून ब्रिटनमध्ये निवडून देखील आले. आणि पुन्हा भारतात येऊन ते स्थायिक झाले व देशासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. दादाभाई नौरोजी हे अठराव्या दशकात पहिले एन.आर.आय होते की जे ब्रिटन मध्ये गेले होते. १८९२ ते १८९५ या काळात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसद सदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. १८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब देण्यात आला. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय होते. दादाभाई नौरोजी यांचे महंमद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते. ड्रेन थेअरी, स्वदेश, स्वराज्य, सत्ता, संपत्ती आणि गरिबी या सर्व त्यांच्याच संकल्पना आहेत.
दादाभाई नौरोजी यांचे ३० जून १९१७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply