नवीन लेखन...

भूमिका (कथा)

आजचे ऑडिशन संपवून संजू वैतागून बॅग भरत असतानाच त्याच्या कानी आष्की चे शब्द पडले,
काय संजू, आज कांही….
आधीच संजू वैतागला होता, त्याच मड मध्ये गेला बोलून,
छा….दोन ऑडिशन दिली…भंकस, एक अँकरसाठी दुसरे ऍड साठी…
आष्की मात्र स्थितप्रज्ञ होती, तिने शांतपणे विचारले,
कशी गेली ?
संजू घुश्यातच होता, चिडक्या आवाजात म्हणाला,
बोललो ना भंकस ! तू पण काय आष्की……

त्याच्याच सोबत इंडस्ट्रीत आलेली, मिळेल ती फुटकळ कामं करणारी आष्की समजुतीच्या स्वरात म्हणाली,
अरे संजू, अजून थोडं थांब ना, स्टुडिओत जरा सोशल हो…
बॅग उचलत, तुच्छ नजरेने संजू म्हणाला, हो, होतो सोशल, म्हणजे  तो कबीर घेईलच माझी, साला डायरेक्टर कमी आणि गे जादा आहे, हरामी….
या सर्व नित्यापाठाचा अभ्यास पडल्यासारखी आष्की म्हणाली, यार चलता है रे, इंडस्ट्री ऐसीं हि है…दिल पे मत ले यार…आशु म्हणजेच आजची आशिकी उर्फ आष्की संजूला शांत करायला बघत होती.
दिलपे नहीं, साला दिमाग मे घुस गया…. अपयशा ने खचलेल्या संजूचा ज्वालामुखी आता उफाळत होता.
आशु त्याच्या जवळ आली, खांद्यावर सहजपणे हात ठेवत म्हणाली, यार, कुल डाउन. देर है अंधेर नहीं, पेशन्स ठेव मिळेल काम.
तुला मिळालं का आष्की ? तू पण वर्षभर ठोकर खात फिरतेस की….
अजून कशाला थांबलीस इथे ?
अरे,शर्मासर म्हणाले, थांब स्पेशल ऑडिशन घेतो…
तो शर्मा, असिस्टंट डायरेक्टर ? साला, एक नंबर कमीना आहे !
संजू आता स्ट्रगलरच्या भूमिकेतून जजमेंटल झाला होता.
आष्की, डोन्ट ट्रस्ट दॅट बास्टर्ड….
आय नो संजू, पण चान्स तर घेतलाच पाहिजे, घर सोडून वर्ष होऊन गेलं, कसंही, कुठंही, कसलंही काम मिळवायलाच  पाहिजे….
आष्की, म्हणून काय तू कास्टिंग काऊचला तयार होणार ?
तू पागल आहेस संजू ? की आंधळा ?? अरे कास्टिंग कोउच च्या नावाखाली जे होत असतं,ते मी
पाच- दहा हजारासाठी रोज करतेच की. अरे तिथे फक्त स्टेज आणि मेल ऍक्टर वेगळा असतो, माझा रोल तोच असतो.
संजू एकदम शॉक मध्ये गेला.
त्याला समजावत, आशु म्हणाली अरे, ते रोजचं पाच दहा हजाराच जिणं हे पोटाची खळगी भरण्यासाठी. आता शर्मा जे करेल त्यात पैसे नाहीत पण एक वेडी आशा आहे, ज्या साठी मी मुंबईत पळून आले. एक संधी पाहिजे, एक रोल मिळाला पाहिजे, जमला पाहिजे आणि पब्लिकला भावला पाहिजे, मग आपण जिंकलं मित्रा !!
तो पर्यंत, तो शर्मा आहे की वर्मा, ठाकूर की कपूर हा विचार नाही करत मी. अशा रात्री येतात आणि जातात, ज्या माझ्या नसतात.
माझी एकतरी रात्र, एकतरी दिवस येईल आणि सगळं बदलून जाईल.
त्या क्षणासाठी मी जगतेय आणि सगळं आनंदानं भोगतेय.
संजूला हे सगळं नवीन न्हवतं, गेल्या दोन वर्षात त्याने अनेक निर्माता, दिग्दर्शक आणि दलालांचे उंबरे झिजवले होते. त्यांच्या विचित्र मागण्या ऐकल्या होत्या. पण आशु चा दृष्टीकोन त्याच्याकडे न्हवता.

आज आशु मध्ये त्याला गुरू दिसल्याचा भास झाला आणि तिला बाय करत त्याने टॅक्सीला हात केला.नाला सोपाऱ्याला पोचेपर्यंत नऊ वाजून गेले होते, पण अंजु अजून आलेली न्हवती.

दार उघडे ठेवून त्याने शॉवर घेतला, अंग पुसत नुसत्या निकरवर तो हॉलमध्ये आला. टीपॉय वर पालथा घातलेला ग्लास सरळ केला त्यात बकार्डी ओतली, थोडे फ्रीज मधले पाणी ओतले, सिगारेट शिलगावली आणि कडवट घोट घेता घेता स्वतःच्या आयुष्यातला कडवटपणा गिळू लागला.
दीड वर्षांपूर्वी त्याने, अंजु आणि इकबाल सोबत हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. इकबालला चार सहा महिन्यांत असिस्टंट म्युझिशिएन चे काम मिळाले आणि त्याचे नशीब पालटले. फ्लॅटमधले दोन जीव कामाच्या शोधार्थ कधी लिव्ह इन मध्ये राहू लागले हे त्यांचे त्यांनाच समजले नाही.
अकरा वाजता अंजु आली.त्याने घुश्यातच तिच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले. तिने हँडबॅग भिरकवली, घ्यायचा असतो म्हणून शॉवर घेऊन आली. त्याच्यासमोर बसत तिने सिगारेट शिलगावली, बाजूचा उलटा ग्लास सरळ करत त्यात बकार्डी ओतली.
त्यात पाणी न घालता बॉटम्सअप केले.जळजळत्या घशातून खदखदणारा राग,चीड ,मळमळ गिळून टाकली.

इतना लेट ? संजूने आईस ब्रेकिंग करता करता दोघांच्या ग्लासमध्ये बर्फाचे क्यूब्स टाकले.

अंजुने मान हलवली, ना नकार ना होकार या स्टाईल मध्ये. दोघांच्या ग्लासात भरपूर बकार्डी ओतली.
अरे यार, ऑडिशन 9 ला संपली आणि तो साला सिंग माझा गूळ काढत बसला.

कुठे बसला होता ? संजूने इंडस्ट्रीतील सर्वात निरर्थक प्रश्न विचारला. कुठे हा प्रश्न नसतो, काय केले हा असतो, पण तो तसा डायरेक्ट विचारण्याची शक्ती संजू गमावून बसला होता.
सी प्रिन्सेस ला बसलो होतो, रेड वाइन घेत. अंजु आता थोडी शांत झाली होती.
ती आता वाईनवर शांतपणे बकार्डीचे घोट घेत होती.
तो ग्लास हातात धरून न पिता बसला होता. तिला त्याचा प्रश्न कळावा म्हणून.
हिरो च्या बहिणीचा रोल आहे, म्हणजे मला ऑफर झालाय… मान खाली ठेवूनच अंजु म्हणाली.
आयला मस्तच झालं ना मग ! संजूची कळी एकदम खुलली.
फ्लॅटचे थकलेले तीन महिन्याचे भाडे, कारचे दोन हप्ते, मित्राकडे केलेली उधारी हे सगळे प्रश्न पटकन सुटल्यासारखे वाटले. आता फक्त इंडस्ट्रीत काम मिळवणे, म्हणजे मिळेल ते काम मिळवणे हे एकच काम शिल्लक होते.

शिफ्ट कधी सुरू होईल ? संजू ने अधीरतेने विचारले.
अंजुने ग्लास उचलून मोठा सिप घेतला, सिगारेटचा घेता येईल तितका मोठा झुरका घेतला.धूर शक्य तितका फुफ्फुसात कोंडून धरला, मग नाकावाटे हळूहळू सोडत ती आजचा प्रसंग आठवू लागली.
देख अंजु, हिरोईन का भूल जा, इतना नई लडकिया आती है रोज…. ये रोल कर ले….साईड रोल है ….दस लाख कमाओगी… जादासे जादा 15-16 दिन तुम्हे कॅमेरे के सामने रहना है… सिंग शांतपणे एकेक शब्द फेकत होता.
हां सर मुझे मंजूर है…..सिंगची ऑफर पूर्ण होण्याआधीच अंजूची अगतिकता होकार देऊन गेली.

सिंग अघळपघळ हसला. म्हणाला, मेरी जान, पुरा सून तो ले, मुझे बाद मे किच किच नहीं मंगता…

अधीर होऊन अंजु ऐकत होती….
देख अंजु, शूटिंग के समय तुम कॅमेरेकी और जब शूटिंग रुकेगा तब तुम मेरे कमरेकी !!

अंजुला अजूनही नक्की काही कळत न्हवतं, तो साईड रोल मिळाला या हर्षवायूतून अजून बाहेर आली न्हवती.  देख अंजु, तू मेरे कमरेकी मतलब, ‘तेरी कमर मेरी !’

आपण खूप मोठी शाब्दिक कोटी केल्याचा आनंद सिंगच्या डोळ्यातून वहात होता.
अंजुला सगळं सगळं आठवलं. घर सोडल्यापासून इथं पर्यंत केलेला प्रवास, त्यात ते रुतलेले काटे, त्या वेदना, त्या खोट्या अपेक्षा आणि मग अपेक्षाभंग. एकावर एक पचवलेले दुःखाचे कढ…… आणि या सर्वात निस्सीम प्रेम करणारा संजू! संजूचे ते जीवापाड प्रेम, ती न बोलता समजून घेण्याची कला, फक्त स्पर्शातून व्यक्त होण्याची त्याची पद्धत….  कोणतीही बांधिलकी, वचन, आणा भाका नसताना सतत सोबत असणारा संजू आणि शरीरापलीकडे जाऊन मन जाणून घेऊन तिच्यावर प्रेम करणारा, संजू !
आता त्याला चिट करायच्या कल्पनेनं तिला रडू आलं. त्यांतून तिनं धैर्य एकवटलं.आलेली संधी हि अशीच सोडायची नाही, आणि संजूला चिट हि करायचं नाही हे मनाशी ठरवत ती म्हणाली, सिंग सर मुझे एक रात का समय दिजीए, मैं कल मिलती हूँ.

एक रात का समय चाहीये ? लेकीन आज नहीं बेबी, आज बिझी हूँ मैं ! सिंगने जोक मारण्याची संधी दवडली नाही.
डोळ्यात डबडबलेले अश्रू आता घरंगळत होते, अंजु मनातील व्यथा बोलून स्वतःला मानसिक कोंडीतून सोडवत होती.
हा प्रसंग ऐकून संजू हळवा झाला, म्हणजे तू कॉम्प्रेमाईझ करणार… त्याने ग्लास ला हात न लावता बाटली उचलून तोंडाला लावली, दुःखाचे कढ हळू हळू पिऊ लागला.

अंजु शांत बसली. तो पित राहिला. कांही वेळाने अंजु म्हणाली , संजू तू कधीपासून ओळखतोस मला ?
तू मुंबईत आलीस आणि काम शोधत होतीस तेंव्हापासून.

मी कशी आले होते, मुंबईला ? जणू अंजु त्याच्या आठवणी ताज्या करून घेत होती.
घरातून पळून आली होतीस, त्या दिलावर सोबत. संजूने पहिला प्रश्न सोडवला.

तुला माहीत आहे संजू , मी आणि दिलावर, नवरा बायको सारखे एकत्र रहात होतो.या वाक्यात प्रश्न न्हवता तर स्टेटमेंट होते.
ते कन्फर्म करत संजू म्हणाला हो ते माहीत आहे, त्याच्याशी ब्रेक अप झाल्यावर तू कास्टिंग डायरेक्टर मेहता कडे रहात होतीस आणि नंतर आपण एकत्र आलो.

हे लक्षात आहे तुझ्या ? अंजुने काही तरी विचारायचे म्हणून विचारले, अगदी निरर्थकपणे.त्याच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडत.

हो हे पण लक्षात आहे, आणि तुला रोल देण्याच्या नावाखाली तुला लोणावळ्याला नेऊन अजून दोघांनी फसवलं हे पण लक्षात आहे.

हो ना ? अंजु आता संजू च्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती.
हे सर्व माहीत असून हि तू माझ्यावर प्रेम करतोस, माझ्यासोबत लिव्ह इन मध्ये रहातोस……

हो अंजु, आय लव्ह यु ! ठामपणे संजू बोलला.

लव्ह करतोस ना, मग सांग मी उद्या काय करू ? मिळणारा रोल स्वीकारू की या सिंग ला नकार देऊन अजून वर्ष दोन वर्षे आपण दोघे खस्ता खाऊ ?

संजू निरुत्तर दिसत होता. तसाच निरभ्र हि झाला होता.त्याची बकार्डी पूर्णपणे उतरली होती.
त्याने अंजुचे दोन्ही तळवे हातात घेतले, घट्ट दाबले. हिच त्याची स्पेशालिटी, स्पर्शाची भाषा. त्या एका स्पर्शाने तिला 4 हत्तीचे बळ मिळाले, ती आपले कान हत्तीसारखे विस्तारून ऐकू लागली.

अंजु, तुला हिस्टरी आहे, मला ही आहे. पण जेव्हा मी तुला जवळ घेतले, तेंव्हा तू जी आहेस, जशी आहेस तसे घेतले.
समज तू सिंग सोबत काही रात्री काढल्यास म्हणून आपल्या नात्यात फरक पडणार नाही. उलट तू हे मला सांगून करतेस यात तुझा मोठेपणा आहे, तुझा समजूतदार पण आहे, आपल्या नात्यातला विश्वास आता अजून दृढ झालाय.

तू उद्या सिंगच्या मिठीत असलीस तरी माझीच असणार आहेस. कुणास ठाऊक या एका रोल ने तुझे आणि माझे हि नशीब बदलेल, जा अंजु, उद्या स्टुडिओत जा, तुझी भूमिका पार पाड, कॅमेऱ्या समोर आणि सिंग समोर सुद्धा !

एक रोल तुला पैसे आणि  भविष्यातील संधी मिळवून देईल, दुसरा रोल तुला पहिली संधी देईल! अंजु, डार्लिंग आय ट्रस्ट यु !! गो अहेड!

पुढच्या क्षणाला ओक्सबोक्शी रडणारी अंजु, संजूला बिलगली होती, तो तिच्या पाठीवर हात फिरवीत तिला धीर देत होता.तिला शांतपणे थोपटत होता.जणू ती एक लहान बाळ होती, आणि तो पोक्त.
त्याच्या छातीवर डोकं ठेऊन मुसमुसुन रडून झाल्यावर ती म्हणाली, संजू, रागावणार नसलास तर एक सांगू ?
संजू भावनाविवश झाला होता, म्हणाला, हो सांग.
तिने आपली नजर त्याच्या नजरेला भिडवली, आणि पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली, संजू, तू सुद्धा त्या कबिरच्या मागणीचा विचार कर.वर जाण्यासाठी आपल्याला जिना हवा असतो.मग त्याच्या पायऱ्या लाकडी आहेत, लोखंडी की दगडी हा विचार नको करुस.एकदा वरच्या मजल्यावर पोचलो की आपले जग आणि प्रश्न दोन्ही बदलतील…..

संजूने अतीव प्रेमाने तिला जवळ घेतले, घट्ट आलिंगन दिले, तिच्या केसातून हात फिरवत पुटपुटला, लव्ह यु डार्लिंग.
त्या आलिंगनात एकमेकांबद्दलचा विश्वास आणि आदर होता, कोणतीही वासना न्हवती. जणू
एक नर व एक मादी यांची जागा एकमेकाला समजून घेणाऱ्या दोन परिपक्व माणसांनी घेतली होती !

© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..