नवीन लेखन...

भूतदया जागविली

चिंव चिंव करीत चिमणा चिमणी       खोलीमध्ये माझ्या आली

अवती भवती नजर टाकून        माळ्यावरती ती बसली  ।।१

 

वाचन करण्यात रंगून गेलो   लक्ष्य नव्हते तिकडे

आश्चर्य वाटले बघून मजला    काड्या गवताचे तुकडे ।।२

 

घरटे बांधण्या रंगून गेली      आणती कडी कचरा

मनांत बांधे एकच खुणगांठ    तयार करणे निवारा ।।३

 

भंग पावता शांत वातावरण      वैताग आला मला

कचरा आणि घरटे काढून      खिडकीतुनी  फेकला ।।४

 

काम संपवूनी सांज समयी    घरी परत मी आलो

त्याच चिमण्या तसेच घरटे     पाहून चकित झालो ।।५

 

पहाट होता चिमण्या उडाल्या    काढून टाकले घरटे

असेंच चालले कित्येक दिवस     परी जिद न सोडी ते ।।६

 

चार दिवसाची सुटी घालउन      गांवाहून परतलो

घरटे बघता संताप येऊन        मुठी  वळवूनी  धावलो ।।७

 

घरट्या मधूनी चिमणी उडाली      बसली पंख्यावरती

चिव चिव करुनी विनवू लागली      दया दाखवा ती ।।८

 

परी मी तर होतो रागामध्ये       चढलो माळ्यावरी

मन चरकले बघून अंडी       छोट्या घरट्यामध्ये ।।९

 

असहाय्य दृष्टीने चिमणी पाही मज  करुणायुक्त नयनी

यश मीळाले तिनेच शेवटी        भूत दया जागवूनी ।।१०

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..