नवीन लेखन...

भौतिक सुखाच्या पल्याड

माणूस नेहमीच भौतिक सुखाच्या छत्रचामरांसाठी अविश्रांत धावत असतो. हे कुणीच नाकारू शकत नाही. परंतु या परिश्रमातून खरंच आत्मसुख , आत्मशांती लाभते कां? हा मूल प्रश्न अनुत्तरीत रहातो. सर्व सुखे दारात असूनही समाधानी , सुखाला वंचित असणारी माणसे आहेत. की ज्यांना मन:शांती लाभली नाही. तर दुसऱ्या बाजूला अत्यन्त सामान्य परिस्थितीत देखील स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देणारी माणसं या जगात आहे.

हा विरोधाभास देखील आपल्याला प्रत्ययास येत असतो. पण अशी माणसं भेटणं हा ही एक भाग्ययोग समजावा.. मला भेटली हे माझे भाग्यच.!!

लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीत देखील अगदी कळतंय अशा वयापासून जो सहवास लाभला तोच सहवास आज जीवन समृद्ध करून गेल्याचे जाणवते. आणि आज ते जणू दीपस्तंभा सारखे मार्गदर्शक भासतात.

त्या बालवयात त्यांचे महत्व कळले नाही. पण आज ते सारे जेंव्हा आठवते तेंव्हा मात्र भौतिक सुखाचा विचार न करता केवळ ज्यातून आपल्याला सात्विक , आत्मिक , आत्मसुख मिळेल याचाच विचार करून जे जगले कार्यरत राहिले आणि केवळ वैचारिक , प्रबोधनात्मक समाजकल्याणाची अत्यन्त कष्टप्रदी अशा कर्तव्यतप्तर्तेची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ( सर्वांची नांवे मी उद्घृत करत नाही) पण आज आपण त्यांच्या अथक प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या महदकार्याचा महाकाय वटवृक्ष जेंव्हा आपण आपल्या डोळ्यांनी पहातो आहोत तेंव्हा त्या ” भौतिक सुखाच्या पल्याड असणारी आत्मशांती आपल्याला जाणवल्या शिवाय रहात नाही.

आज ज्यांच्या उत्तुंग अशा विवेकी दैवी संकल्पनेतून आपल्याला जे जे उत्तुंग दिसते आहे ती एक कल्याणकारी साधना आहे, ती एक तपश्चर्या आहे. हे निर्विवाद. अगदी कौटुंबिक स्तरावर जरी विचार केला तरी आपल्या पूर्वजांनी अगदी आजोबा , पणजोबांनी केलेल्या एखाद्या आम्रवृक्षाचे बीजारोपण आणि त्याचा आपण आपण घेत असलेला उपभोग ही त्या आपल्या पूर्वजांची साधना, तपश्चर्याच म्हणावी लागेल. ही निस्वार्थी तपश्चर्या म्हणजेच आत्मसुख ,आत्मशांती आहे.

विज्ञानयुगात भौतिक सुखाच्या व्याख्येत संस्कारी अध्यात्मिक मनाचे आभाळ कधी रमत नाही. त्या अंतरमनाला खऱ्या आत्मिक सुखाची नितांत गरज असते.

जगात जगताना बेगडी हास्यसुखाचा मुखवटा पांघरून जगणे म्हणजे आपल्या अंतरिक सत्य सुखापासून दुर्दैवाने वंचित रहाणे असते.

म्हणून जगतांना भौतिक सुखाच्या पलीकडे असणारे आत्मानंदी कृतार्थी सुख महत्वाचे असते.

आज जगाच्या दृष्टीने आपल्या भूमिकेतून आपण खूप समृद्ध जीवन जगलो आहोत असे आपल्याला वाटत असते. साऱ्या षड्रिपुंशी आपली ओळख झालेली असते. साऱ्या भौतिक सुखांच्या क्षणिक छत्रचामरात देखील आपण सुखात आहोत याची अनुभूती येते देखील.

पण आपल्या शिशुशैशवातील , बाल्यावस्थेतील निरागसता मात्र हरविलेली असते. मग जेंव्हा अंतर्मुख होतो. तेंव्हा खरे सुख म्हणजे भौतिक वैभवी सुख ? की तो निरागस वात्सल्य प्रीतीच्या मैत्रेय नात्यांचा निर्मोही लडिवाळ सहवास ?

हा प्रश्न मनाला भेडसावत रहातो. हे तितकेच खरे…!!!

म्हणूनच अध्यात्म ( आत्ममुख होणे ) हा भारतीय संस्कार आहे. आणि या संस्कारातूनच मानवाला भौतिक सुखाच्या पल्याड असणाऱ्या त्या चिरंतन दैवी आत्मसुखशांतीची , निर्मल , सात्विक , सोज्वळ प्रीतभावनांची अनुभूती येते.

इती लेखन सीमा

— वि.ग.सातपुते.

9766544908

२३ फेब्रुवारी २०२२

पुणे .

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..