सई लोकूर मूळची बेळगावची. तिचा जन्म ५ सप्टेंबर १९८९ रोजी झाला. सईचे बालपण आणि शालेय शिक्षण सुध्दा बेळगावातच झाले. १२ वी नंतर ती मुंबईला आली. सई लोकूर ही गेली तीस हून अधिक वर्षे बेळगावातील नाट्यक्षेत्रात कार्य करणा-या विणा लोकूर यांची कन्या. सईच्या बालपणी तिच्या आईने खूप क्लासेस लावले होते. शाळेतून आल्यानंतर क्लासला जायचे, त्यानंतर चित्रकला, तबला, पेटी, गाणं, भरतनाट्यम, संस्कारभारती रांगोळी, मेहंदी या क्लासला जायचे. तसंच सई स्विमिंग, बॅटमिंटनची खूप आवड होती. तसेच सई स्टेट लेवल स्विमर राहिली आहे.
सईला लहानपणापासून मला चित्रपट, गाणी खूप आवडायचे. मी चित्रपट पाहून आरशा समोर अभिनय, डान्स करायची. ‘रायगडाला जाग आली’ या नाटकात काम केले होते. ते तिच्या आयुष्यातले पहिले नाटक होते. या नाटकाचे बेळगावसोबतच सांगली, मिरज, कोल्हापूरात प्रयोग झाले. नाटक संपले की प्रेक्षकांकडून माझे खूप कौतुक झाले.
या नाटकानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सईने बालकलाकार म्हणून अनेक नाटकात काम केली. चित्रपटसृष्टी मुंबईत असल्यामुळे बेळगावातून मुंबईला ऑडिशनसाठी यायला लागायचे. बेळगावरुन आई सोबत बसने रात्रीचा प्रवास करायचे आणि मुंबईत येऊन ऑडिशन द्यायचे. खूप वर्ष तिने बेळगाव- मुंबई प्रवास केला. त्यानंतर तिने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आणि मी १२ वी नंतर मुंबईत आली.
तेव्हा तिच्या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवासाला सुरुवात झाली. सई लोकूर ने ‘प्लॅटफॉर्म’ या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले. विणा लोकूर यांनी ‘मिशन चॅम्पियन’ या चित्रपटानंतर ‘प्लॅटफॉर्म’ हा चित्रपट बनवला व हिंदीत जसे नट, दिग्दर्शक आपल्या मुलांना संधी देतात त्याप्रमाणे मुलगी सई लोकूर हिच्या साठी यातून लॉन्च केले. मुंबईत आल्यावर तिने आपले शिक्षण रुपारेल कॉलेजमध्ये बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले. कपिल शर्मा सोबत ‘किस किस को प्यार करु’ हा हिंदी चित्रपट तिने केला.
त्यानंतर एसएनडीटी कॉलेजमधून तिने इंटिरिअर डिझायनिंग पूर्ण केले. सईने मराठी बिग बॉस मध्ये भाग घेतला होता. बिग बॉसच्या घरात असताना पुष्कर, मेघा आणि सईची खूप चांगली मैत्री होती. पुष्कर आणि तिची जोडी गाजली होती.‘पारंबी’ आणि ‘आम्ही तुमचे बाजीराव’ या चित्रपटातही सई लोकूरने भूमिका केली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये सईने तीर्थदीप रॉय सोबत लग्न केले आहे.
-संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply