मी ‘बिनबूडाचे गाडगे’ हा वाक्प्रचार ऐकत आलेलो आहे.अगोदर फक्त गाडग्याबद्दल माहिती होती. असले गाडगे मी प्रत्यक्ष बघितले, त्याचे वैशिष्ट्य न्याहळली तेव्हा लक्षात
आले, ‘बिनबूडाचे माणसे’ हा त्याचा सांकेतिक, लाक्षणिक अर्थ आहे.
आपल्या अवतीभवती असली ‘बिनबूडाची माणसे’ दिसून येतात. विवेक नसलेली, तत्व, सिद्धांत नसलेली, पाहिजे तेव्हा पाहिजे तसे
वागणारी, बोलणारी अस्तित्वहीन माणसे.
वागण्यात, बोलण्यात मेळ नसलेली, खोटारडे लोक जे कधी कोणता पावित्रा घेतील सांगता येत नाही.
‘मागे एक पुढे एक’ अशी इतरांना तोंडघशी पाडणारी धोकेबाज माणसे. ज्यांनी सत्य आणि
न्यायाशी काडीमोड केलेला असतो. स्वत:चा दूषित हेतु साध्य करण्यासाठी कट कारस्थाने करणारी माणसे अत्यंत लुच्ची असतात.
आपलेच म्हणणे खरे करण्यासाठी आटापिटा
करणारी. तोंडावर गोड बोलून तोंडघशी पाडणारी
आपल्या फायद्यासाठी इतरांचा बळी देणारी, केसांनी गळा कापणारी, अत्यंत महत्वाकांक्षी, परस्पर काटा काढून नामानिराळे होणारी माणसे.
साधुसंत, महापुरुषांचा वचनभंग करणारी,बुद्धीवंत,ज्ञानी व्यक्तीचा द्वेष करणारी,
स्वाभिमानी व्यक्तीचा अपमान करणारी ईर्ष्याळु
माणसे. ‘मला नाही तर तुला नाही.’ असली जळाऊ वृत्तीची. कुणाचे बघून जळफळाट करणारी, दांभिक, ढोंगी माणसे.
फायद्यासाठी निंदा, स्तुती करणारी पाताळयंत्री
माणसे.
असल्या बिनबुडाच्या, तत्वहीन माणसांपासून
सावध राहणे गरजेचे असते.
— ना.रा.खराद.
Leave a Reply