नवीन लेखन...

गब्बर सिंग यांचे प्रेरणादायी चरित्र…

गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला नाही.


साधे जीवन व उच्च विचार :

गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला. आणि विचारांच्या परिपक्वते बद्दल काय सांगावे, ‘जो डर गया, सो मर गया’ या सारख्या संवादांनी त्याने जीवनातल्या क्षणभंगुरतेवर प्रकाश टाकला आहे.

गब्बरची दयाळू प्रवृत्ती:

ठाकूरने गब्बरला आपल्या हातांनी पकडले होते. यामुळेच त्याने ठाकूरचे फक्त दोन हातच कापले. तो त्याचा गळाही कापू शकला असता, पण त्याच्या ममतापूर्ण आणि करुणामय हृदयाने त्याला असे करू दिले नाही.

नृत्य आणि संगीताचा चाहता:

‘मेहबूबा ओ मेहबूबा’ या गाण्याच्या वेळेस त्याच्या कलाकार हृदयाचा परिचय मिळतो. अन्य डाकुंसारखे त्याचे हृदय शुष्क नव्हते. तो जीवनात नृत्य-संगीत या कलेंच महत्व जाणून होता. बसंतीला पकडल्यानंतर त्याच्यातला नृत्य प्रेमी खळबळून जागा झाला होता. त्याने बसंतीच्या आत दडलेल्या नर्तकीला ओळखलं होत. तो कलेच्या प्रती आपले प्रेम अभिव्यक्त करण्याचे कोणतेही कारण सोडत नसे.

अनुशासन प्रिय गब्बर :

जेव्हा कालिया आणि त्याचे मित्र आपल्यावर सोपविलेली कामगिरी पार न पडताच परत आले होते, तेव्हा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या अनुशासन प्रिय स्वभावाला साजेसं वर्तन त्याने केलं. आणि त्या तिन्ही जणांना शासन केले.

हास्य प्रेमी :

त्याच्याकडे कमालीचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ होता. कालिया आणि त्याचे दोन मित्र यांना मारण्याच्या आधी त्याने त्यांना खूप हसविले होते. कारण हसता हसता या जगाचा त्यांनी निरोप घ्यावा असे त्याला मनापासून वाटत होते.

तो आधुनिक युगातला ‘लाफिंग बुध्द’ होता.

स्त्रियांविषयी आदर:

बसंती सारख्या सुंदर मुलीला पकडल्यानंतर त्याने तिच्याकडे फक्त एका नृत्याची विनंती केली. आत्ताचा डाकू असता तर त्याने कदाचित वेगळंच काही तरी मागितलं असतं.

भिक्षुकी जीवन :

त्याने हिंदू धर्म आणि महात्मा बुध्द यांनी दाखविलेला मार्ग स्वीकारला होता. रामपूर आणि इतर गावामधून त्याला जे काही मिळत असे त्यानेच तो आपले भागवत होता. सोने, चांदी, चिकन बिर्याणी, मलाई, पनीर, ब्लॅक लेबल, एन्टिक्विटी इ. भोगविलासी वस्तूंसाठी तो कधी शहराकडे नाही गेला.

सामाजिक कार्य :

एकीकडे आपला डाकू पेशा संभाळत असताना तो लहान मुलांना झोपविण्याचे कामही करत होता. शेकडो माता त्याचे नाव घेऊन आपल्या उनाड मुलांना झोपवत असत. सरकारने त्याच्यावर ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्या काळात ‘कोन बनेगा करोडपती” नसल्याने लोकांना रातोरात श्रीमंत बनविण्याचा गब्बरचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. …

— टवाळ

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..