जगभरात लोकप्रिय ठरलेला कार्टून मिकी माऊस आता ९३ वर्षांचा झाला आहे. इतक्या वर्षांनंतरही मिकीची प्रचंड क्रेझ आहे.
९३ वर्षांचे मिकी माऊस जगातील सर्वात वयस्कर कार्टून कॅरेक्टर. फेलिक्स-द कॅट हे पहिले तर बोन्जो-द डॉग हे दुसरे कार्टून कॅरेक्टर आहे.
१८ नोव्हेंबर १९२८ रोजी मिकी माऊस ने ‘स्टीमबोट विल्ली’ कार्टून द्वारे न्यूयॉर्कच्या कॉलनी थिएटर मध्ये डेब्यू केला, म्हणून मिकीचा जन्मदिन १८ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या मिकी माऊसच्या पहिल्या चित्रपटाला स्वत: वॉल्ट डिस्नीने आवाज दिला होता.
डोनाल्ड डकचे कॅरेक्टर १९३४, टॉम अँड जेरी कार्टून १९४० मध्ये लोकांसमोर कार्टून मालिकेच्या बाबतीत मिकी माऊसचा पहिला कार्टून एपिसोड स्टीमबोट विली हे जगातील नववे सर्वात जुने कार्टून आहे.
अकॅडमी१९०८ मध्ये आलेली फँटासमागोरी ही जगातील सर्वात जुनी कार्टून मालिका म्हणून ओळखली जाते. हे करेक्टर लोकप्रिय झाले तेव्हा जिम मैक्डोनॉल्ड मिकी चा आवाज बनला होता. वॉल्ट डिस्नीने मिकीच्या नंतर डोनॉल्ड डक व गूफी सारखे करेक्टरला जन्म दिला.
१९३२ ते १९६९ या काळात डिस्नीने २२ अॅकाडमी अवॉर्ड जिंकले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply