ब्रिटिश साम्राज्यवाद्यांपासुन भारताची सुटका करण्यासाठी गेल्या शंभर वर्षात १९४७ पर्यंत अनेक संघटना उदयास आल्या. राष्ट्रीय कॉंग्रेस, आझाद हिंद सेना, डिप्रेस्ड क्लासेस लिग, समाजवादी पक्ष, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन , हिंदु महासभा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आदी संघटना स्वातंत्र्यासाठी लढत राहिल्या. या लढ्यातून पुढे भारताला स्वातंत्र्यही मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी त्यांच्या “शुक्रवारी” या नागपूर येथील निवासस्थानी केली. स्थापने पासूनच संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.
स्वयंसेवक संघाचा मूळ उद्देश संघटित सांस्कृतिक राष्ट्रवाद असला तरी संघटनेच्या निर्मितीमागे, इतिहास काळात हिंदूधर्मीयात संघटनात्मकतेचा अभाव असल्याबद्दलचे कारण, मुख्यत्वे मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनरींकडून झालेल्या/करविल्या गेलेले धर्मांतर, पुरोगामी आणि वैश्वीकरणामुळे येणार्या पाश्चात्य जीवनशैलीच्या विघातक प्रभावांबद्दल नकार आणि संशयवाद, स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीवादाच्या जहालवादास नकार, अल्पसंख्याकांचे काँग्रेस/महात्मा गांधी यांच्याकडून होणारे नको तेवढे लाड आणि यांचा लोकानुनय ही प्रमुख कारणे होती. त्यासाठी हत्यारी लढ्याच्या मार्ग स्वीकारला होता. त्याचाच भाग म्हणून सैनिकी शिक्षणाच्या धर्तीवर संघाने शाखा सुरु केल्या. मात्र प्रथमपासून संघ राजकीय नाही असेच सतत सांगत राहिला. अश्या प्रकारे संघाने स्वतःची एक ‘विशिष्ठ प्रतिमा’, ‘खास चारित्र’ निर्माण केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना.
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते॥१॥
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्
सुशीलं जगद् येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत् कण्टकाकीर्णमार्गम्
स्वयं स्वीकृतं नः सुगङ्कारयेत्॥२॥
समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रम्
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्राऽनिशम्।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम्
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्
समर्था भवत्वाशिषा ते भृशम्॥३॥
॥भारत माता की जय॥
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply