अभिनेत्री हेमल इंगळे यांचा जन्म दि. २ मार्च १९९६ रोजी कोल्हापूर येथे झाला.
हेमल इंगळेने सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी हि आशिकी’ या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. मुळची कोल्हापूरची असलेली हेमल इंगळेचे शालेय शिक्षण होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल, डॉ.डी.वाय.पाटील शांतिनिकेतन कोल्हापूर येथे झालं आणि पुढचे शिक्षण तिने पुण्यात फर्ग्युसन कॉलेज मध्ये घेतले.
हेमलने चित्रपटात काम करण्याआधी मॉडेलिंग पासून आपलं करिअर सुरु केलं होतं. ह्या काळात तिने अनेक ब्युटी स्पर्धा जिंकल्या होत्या. हेमल मध्ये मिस युनिव्हर्सिटी इंडिया २०१५ ची विजेती राहिली आहे. तसेच २०१६ साली पर्यावरण आधारित सौंदर्य स्पर्धा मिस अर्थ इंडिया येथे तिने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि ह्या स्पर्धेची सुद्धा ती विजेती ठरली.
सचिन पिळगावकरांनी दिग्दर्शन केलेला ‘अशी हि आशिकी’ या चित्रपटात तिने साकारलेलं अमरजा हे पात्र सगळ्यांनाच फार आवडलं. ह्या चित्रपटात तिने अभिनय बेर्डे सोबत काम केलंय आणि ह्या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. ह्या व्यतिरिक्त ‘आस’ ह्या मराठी सिनेमात सुद्धा तिने मुख्य भूमिका साकारली आहे. २०१९ साली हुशारु नावाच्या तेलगू चित्रपटात हेमलला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हेमलचे तेलगू फॅन्स सुद्धा अनेक आहेत.
हेमल इन्स्टाग्रामवर भरपूर ऍक्टिव्ह असून. लॉकडाऊनच्या काळात तिने अनेक जिम ट्रेनर्स सोबत Live Session करून लोकांना भरपूर माहिती दिली. तसेच इंस्टाग्रामवर तिने ‘कॅमेरा ऍडजस्ट करके’ ह्या नावाने एक छोटी सिरीज चालू केली आहे. ह्या सिरीजमध्ये तिने आपल्या फॉलोअर्सला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बऱ्याच टिप्स दिल्या आणि त्यांना मोटिव्हेट केलं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply