नवीन लेखन...

कटू पण खरेच सांगत आहे…..

एका अज्ञात कवीची ही रचना WhastApp वरुन आली.


येत्या १५/२०  वर्षात एक पिढी हे जग सोडून जाणार आहे ! कटू पण खरेच सांगत आहे…..

या पिढीतील लोक कसे वेगळेच ……..
रात्री लवकर झोपणारे
सकाळी लवकर उठणारे
पहाटे फिरावयास जाणारे
पहाटे अंगण सडा पाहणारे
बागेला पाणी देणारे
देवपूजेसाठी फुले तोडणारे
पूजा अर्चा करणारे
पापभीरू ……
मंदिराला जाणारे
रस्त्यात सगळ्यांशी बोलणारे
सुख दु:ख विचारणारे
दोन हात जोडून नमस्कार करणारे ….
मंदिरात साष्टांग दंडवत घालणारे
आरत्यामागून आरत्या म्हणणारे
पूजा झाल्याशिवाय अन्नग्रहण न करणारे
त्यांचे जगच कसे सण वार ,
पै-पाहुणे ,भाजीपाला . कडधान्ये ,तीर्थयात्रा ,रीतीरिवाज अश्या गोष्टींभोवती फिरणारे !
जुन्या फोनचेच कौतुक करणारे
पाच पन्नास फोनच्या डायऱ्या बाळगणारे
आणि नेहमीच चूक नंबर फिरवणारे
आणि चुकून नंबर लागलेल्या इसमा शी पण …..
तास भर बोलणारे !
दिवस भरात तीन चार वर्तमानपत्रे वाचणारे
विको वज्रदंती आणि मंजन वापरणारे
नेहमीच एकादश्या अन व्रतवैकल्ये
देवावर अन चांगुलपणावर
प्रचंड विश्वास ठेवणारे
समाजाची भीती बाळगणारे
सायकल चालवणारे
जुन्या चपला खिळे ठोकून
वर्षानुवर्षे वापरणारे
सदरा आखूड होईल
म्हणून लांब शिवणारे
सणावाराला अत्तर लावणारे
डिंकाचे लाडू खाणारे
उन्हाळ्यात लोणचे घालणारे
दृष्ट काढणारे
अन भाजीवाल्याशी भावावरून हुज्जत घालणारे
वर्षातून मोजकेच सिनेमे पाहणारे
हे सगळे लोक हळू हळू
सोडून जात आहेत
तुमच्या कडे आहे का कोणी
असल्यास नीट जतन करा या endangered species चे
आणि शिका त्यांच्या कडून
काय…….?
अहो जाणार आहे
त्यांच्यासोबत एक महत्वाची गोष्ट
ती म्हणजे
“समाधानी आयुष्य’’ !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..