सीडी व डीव्हीडी यांच्यापेक्षाही अधिक सरस असे तंत्रज्ञान असलेल्या ब्लू रे डिस्कचा जन्म अलीकडच्या काळातील आहे. डीव्हीडीनंतर विकसित झालेले हे तंत्रज्ञान आहे.
ब्लू रे डिस्कला बीडी असे संक्षिप्त नाव आहे. डीव्हीडीप्रमाणेच ही ऑप्टिकल डिस्क असून सीडी व डीव्हीडी या दोन्हीतील कमतरता यात भरून काढल्या आहेत. या ब्लू रे डिस्कचा व्यासही १२ से.मी. असतो व तिच्या प्रत्येक थरात २५ जीबी माहिती असते, तर ड्युअल लेयर डिस्कमध्ये हीच क्षमता दुप्पट म्हणजे ५० जीबी असते. रे डिस्कमध्ये मिनी डिस्कही उपलब्ध असून ती ८ से.मीची असते, तिची क्षमता ७.८ जीबी व ड्युअल लेयरसाठी १५.६ जीबी असते. ब्लू रे डिस्क या बीडी (आर) व बीडी (आरई) या दोन स्वरूपात उपलब्ध आहेत. या डिस्कमध्ये मूळ तंत्रज्ञान सीडीचेच असले तरी इतर अनेक बारीक बदल केलेले आहेत.
व्हीडीमध्ये तांबड्या रंगाचा लेसर वापरतात, ब्लू रे स्कमध्ये निळ्या रंगाचा लेसर माहिती वाचण्यासाठी वापरलेला असतो. यात निळा असा शब्द वापरला असला तरी लेसरची छटा ही जांभळ्या गाची असते. तो ४०५ नोमीटरचा असतो. ब्लू रे डिस्कमध्ये ज्या बिंदूंवर माहिती साठवली जाते त्यांचा आकार हा ५८० नॅनोमीटर इतका सूक्ष्म असतो. यात दोन माहितीचे थर अगदी जवळजवळ असतात त्यामुळे सुरुवातीला त्यात ओरखड्यांची समस्या जास्त होती. ती दूर करण्यासाठी कठीण आवरण तंत्रज्ञान शोधण्यात आले. त्यामुळे ओरखडा पडला तरी ब्लू रे डिस्कवर फार परिणाम होत नाही. यातील सर्वात महत्त्वाचा शोध होता तो ब्लू लेसर डायोडचा. त्याचे श्रेय जपानचे शुजी नाकामुरा यांना जाते.
डीव्हीडीपेक्षा सहा पट अधिक माहिती ब्ल रे डिस्कमध्ये असल्याने ती वाचण्यासाठी निळा लेसर आवश्यक असतो. ती हाय डेन्सिटी ऑपटिकल डिस्क म्हणून ती ओळखली जाते. ब्लू रे डिस्क असोसिएशनने ही डिस्क विकसित केली. ऑक्टोबर २००० मध्ये सियाटेक प्रदर्शनात पहिली ब्लू रे डिस्क सादर करण्यात आली. त्यानंतर १० एप्रिल २००३ रोजी बीडी-आरई रेकॉर्डर बाजारात आला. २००९ मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका व कॅनडा या देशांमध्ये अशा प्रकारच्या ब्लू रे डिस्क मिळू लागल्या पण त्यांचे प्रमाण फार कमी आहे. २०११ मध्ये ब्लू रे डिस्कचा वापर वाढण्याची शक्यता आहे.
Leave a Reply