नवीन लेखन...

ब्लूटूथ तंत्रज्ञान

ब्लूटूथ हे संदेशवहनाचे एक तंत्रज्ञान आहे. विशेष म्हणजे यात कुठल्याही वायरचा वापर न करता एकमेकांशी संपर्क प्रस्थापित करता येतो, तसेच माहितीची देवाणघेवाणही सुरक्षितपणे करता येते.

कमी तरंगलांबीच्या रेडिओ लहरींचा वापर करून हे साध्य केले जाते. लॅपटॉप, मोबाईल, मोडेम यांसारखी साधने विशिष्ट अंतरात असतील व त्यांच्यात ब्लूटूथ सुविधा असेल तर आपल्याला कुठल्याही वायरचा वापर न करता त्यांच्यात संपर्क प्रस्थापित करून हवी ती कामे करता येतात, पण याला १० मीटर म्हणजे ३२ फूट इतक्या अंतराची मर्यादा असते. ब्लूटूथ सुविधा असलेली ही साधने एक नेटवर्क तयार करतात, त्याला पॅन म्हणजे पर्सनल एरिया नेटवर्क असे म्हणतात.

दहाव्या शतकात डेन्मार्कमध्ये हॅराल्ड ब्लूटूथ नावाचा राजा होऊन गेला, त्याने डेन्मार्क व नॉर्वे या देशांचा काही भाग एकत्र करून नव्या देशात ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला होता. ब्लुटूथचा एका लढाईत नंतर मृत्यू झाला. त्याच्या नावावरून या तंत्राला ब्लूटूथ हे नाव दिले गेले आहे. जेव्हा काही इलेक्ट्रॉनिक साधने एकमेकांच्या संपर्कात राहून काम करतात तेव्हा त्यासाठी कंपोनंट केबल्स, विद्युत वायर्स, वायफाय, इन्फ्रारेड संदेश असे अनेक प्रकार वापरता येतात, पण त्यात अनेक मर्यादा आहेत म्हणून ब्लूटूथ हे तंत्रज्ञान त्यापेक्षा प्रगत मानले जाते.

ब्लूटूथची सुरुवात आरएस-२३२ या डेटा केबल्सला पर्याय म्हणून झाली. नंतर १९९४ मध्ये एरिकसन कंपनीने हे तंत्र अधिक विकसित केले. यात २.४ गिगॅहर्ट्स ही लघु पल्ल्याची रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरली जाते. ब्लूटूथच्या मदतीने किमान आठ यंत्रे तरी एकमेकांना जोडता येतात, मग ती वेगवेगळ्या खोल्यांत का असेनात. यात प्रत्येक यंत्र वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर चालते, त्यामुळे लहरींची सरमिसळ होत नाही याला स्प्रेड स्पेक्ट्रम फ्रिक्वेन्सी हॉपिंग असे म्हणतात.

केवळ एक मिलीवॉट इतक्या कमजोर सिग्नलवर ही यंत्रे एकमेकांच्या संपर्कात राहतात. या लहरी सोडण्यासाठी एक ट्रान्समीटर असतो. कुठलीही बटने न दाबता ही यंत्रे एकमेकांशी इलेक्ट्रॉनिक संभाषण करतात व माहितीची देवाणघेवाणही करतात. ब्लूटूथ स्पेशल इंटरेस्ट ग्रुपमध्ये किमान १३ हजार कंपन्या काम करीत आहेत. आयपॉड टच, लेगो माइंडस्टार्मस, प्लेस्टेशन ३ अशी अनेक उत्पादने या तंत्रावर चालतात. मोबाईल फोन सध्या ब्लूटूथ-३ तंत्रज्ञानाकडे वाटचाल करीत आहेत, पण कॅसियोने ब्लूटूथ-४ विकसित केले असून, त्यांनी त्यावर आधारित मोबाईल फोन लासवेगास येथे सादर केला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..