क्रीडा समीक्षक व समालोचक बॉबी तल्यारखान यांचा जन्म १८९७ मध्ये झाला.
पारसी समाजाचे भारतीय क्रिकेटला मोठे योगदान आहे. पॉली उम्रीगर, नरी काँट्रॅक्टर हे दोन कर्णधार भारताला दिले ते पारशानीच. अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान हे सुद्धा पारशी.
मंगेश पाडगावकरांसारखा जाड चष्मा आणि दाढी असलेले हे एक महान समालोचक होते. बॉबी तल्यारखाननी एकदा तंत्रशुद्ध फलंदाज विजय़ मर्चंटची खिल्ली उडवली होती. काय झालं होतं. मुंबईला ब्रेबॉन स्टेडिअमवर अब्बास अली बेगने सुंदर फलंदाजी केली. तो दिसायलाही सुंदर होता. मैदानावर धावत जाऊन एका तरुणीनं त्य़ाचं चक्क चुंबन घेतलं.त्यावर तल्यारखान ह्यांनी विजय़ मर्चंट यांच्या फलंदाजी वर टिप्पणी केली होती. की ‘तेव्हा त्या झोपलेल्या असायच्या’, हा टोला त्यांनी मर्चंट ह्यांच्या संथ संयमी फलंदाजीला हाणलेला होता. मर्चंट हे जगातल्या तंत्रशुद्ध फलंदाजांपैकी एक होते. बॉबी तल्यारखान यांचे १३ जुलै १९९० रोजी निधन झाले. तल्यारखान यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
संजीव वेलणकर.
९३२२४०१७३३
पुणे.
Leave a Reply