नवीन लेखन...

“बोला, मराठी बोला..”

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी..!”

या ओळींचा आज महापूर येणार..आजचा मराठीचा ‘दिन’ केला की आपले कर्तव्य पार पाडले एवढीच त्यामागील भूमिका..

मराठीतून बोलणं मागासलेपणाचं लक्षण  आहे असं आपण मराठी माणसांनीच ठरवून टाकलंय त्यामुळे, ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ या ओळीला एक सुंदर ओळ या पलीकडे काहीच अर्थ उरत नाही. या ओळीत अर्थ भरणं सर्वस्वी आपल्या हातात आहे..निदान मोबाईल कंपन्या वा अन्य मार्केटींग कंपन्यांकडून येणाऱ्या फोनवर किंवा जिथे जिथं आपण पैसे खर्च करणार आहोत अशा हाॅटेल, माॅल/दुकान, रिक्शा/टॅक्सी, इंटेरीअर डिझायनर/काॅन्ट्रॅक्टर इत्यादीसारख्या अनेक ठिकाणी आपण कटाक्षाने फक्त आणि फक्त मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला तर समोरच्याला मोडकं तोडकं का होईना पण मराठीत बोलण्यावाचून पर्याय राहाणार नाही; आणि खरोखर जर का आपण हे करू शकलो तर मात्र, “बोलतो मराठी” ही ओळ सिद्ध होईल..ही एक छोटीशी सुरूवात करणे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ती जर आपण आजपासूनच केली तर पुढील वर्षी याच दिवशी आपण अभिमानाने म्हणू शकू की, “जाहलो खरेच धन्य ‘ऐकतो’ही मराठी..!”

मुलांशी आग्रहाने आपल्या भाषेत बोला. आपली भाषा आपली हजारो वर्षांची परंपरा, संस्कृती व (आपण मऱ्हाटी असल्यामुळे) आपला बाणा आपल्या शब्दांतून पुढच्या पिढीकडे नकळत पोचवत असते..आताच्या मुलांशी त्यांचे पालक आग्रहाने इंग्रजीतून बोलत असतात. परिणामी आपल्या भाषेतून पुढच्या पिढीकडे आपोआप संक्रमित होणारी आपली संस्कृती (व देशभर प्रखर म्हणून प्रसिद्ध असलेला तो ‘मऱ्हाटी बाणा’ही) आपणच मारत चाललोय..आपली नविन पिढी बिन-कण्याची होतेय त्यामागे हे देखील एक कारण आहे.

‘A’ अॅपल मधला व ‘B’ बॅट मधला हे कळण्यापेक्षा ‘अ’ आईतला आणि ‘ब’ बाबांमधला हे कळणं जास्तं महत्वाचे अाहे..! आपण वेळीच सावध न झाल्यास ‘मराठी दिना’ ऐवजी मराठीचे ‘दिवस करण्याची’ वेळ लवकरच येईल हे मात्र नक्की..!!

सर्व मराठी माणसांना मराठीचा ‘अभिमान’ अंगी वागवण्याची होण्याची बुद्धी लाभो या शुभेच्छा..!!

‘मराठी भाषा दिना’च्या आपणा सर्वांना शुभेच्छा..!!

जाता जाता-

लोकलमध्ये भांडताना मराठी माणूस नेहेमी इंग्रजीचा आधार घेताना दिसतो..खरंतर भांडण्यात तलवारीची धार असणारी मराठीइतकी धारदार भाषा अलम हिन्दुस्थानात दुसरी नसावी..मराठी माणसाने आतापर्यंत जे काही या देशात मिळवलंय ते भांडूनच (आठवा, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा) ..मराठ्यांना दिल्लीश्वर बिचकून असतात ते काय उगीच? अंगाला भाल्यासारख्या आरपार छेदून समोरच्याला गारद करणाऱ्या शिव्या मराठी व्यतिरिक्त केवळ पंजाबीत सापडतात (भांडणारे दोघेही मराठी असतील आणि मातृभाषेतून भांडत असतील तर मात्र कान बंद करून घ्यावेत)..असं असताना भांडणात परकीय भाषांचा आधार का घ्यावा हे कळत नाही..निदान भांडण, शिवी-गाळ तरी आपल्या भाषेतून करण्यास काय हरकत आहे..

–गणेश साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..