नवीन लेखन...

चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी झाला.

मनोजकुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी. दिलीपकुमार यांचा त्यांच्यावर सखोल प्रभाव होता. इतका की १९४९ मध्ये चित्रपट “शबनम’मध्ये ज्या दिलीप कुमारने मनोजकुमारचे पात्र साकारले होते, त्यामुळेच त्यांना ओळख मिळवून दिली. त्यांनी नाव बदलून मनोजकुमार असे ठेवले.

त्यांनी सन १९५७ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या “शहीद’ या चित्रपटाने मोठी लोकप्रियता मिळवली. “उपकार’ या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. मनोजकुमार यांनी अनेक देशभक्ती पर चित्रपटांची निर्मितीही केली. त्यामुळे ते “भारतकुमार’ या टोपण नावानेही ओळखले जातात. उपकार, पूरब और पश्चि म, रोटी, कपडा और मकान, क्रांती, वो कौन थी हे चित्रपट मनोजकुमार यांचे गाजलेले आहेत. मनोजकुमार यांचे हरियाली और रास्ता, वह कौन थी, हिमालय की गोद में, उपकार, दो बदन, पत्थर के सनम, पूरब और पश्चिपम, रोटी, कपडा और मकान आणि क्रांती हे चित्रपट विशेष गाजले.

देशभक्तीपर आधारित चित्रपटांसाठी ते ओळखले जातात.

उपकार या चित्रपटासाठी मनोजकुमार यांना ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला. १९९२ मध्ये भारत सरकारने त्यांना “पद्मश्री’ व दादासाहेब फाळके देऊन गौरविले. हरिकिशनचा मनोज बनलेल्या व्यक्तीचा “भारतकुमार ‘ कसा झाला याचा किस्सा. मनोजकुमार यांचा “शहीद’ चित्रपट १९६५ मध्ये आला होता. त्यात त्यांनी शहीद -ए- आझम भगतसिंग यांचे पात्र साकारले होते. वास्तव आयुष्यात ते भगतसिंग पासून खूप प्रभावित आहेत. हा चित्रपट तेव्हा तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी पाहिला होता. त्या काळात पंतप्रधान शास्त्रींनी देशाला “जय जवान- जय किसान’चा नारा दिला होता. तो नारा ते देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवू इच्छित होते. त्यासाठी चित्रपटापेक्षा चांगले माध्यम दुसरे कुठले होते? त्यामुळे त्यांनी मनोजकुमार यांना सल्ला दिला की हा नारा केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती फिरणारा एक चित्रपट तयार करावा. त्यातून मनोजकुमार यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरलेला चित्रपट साकारला. तो होता “उपकार'(१९६७). त्यात त्यांनी गावातील युवक “भारत’चे पात्र साकारले होते. व्यवसायाने शेतकरी होता. परंतु १९६५ मध्ये शत्रूने जेव्हा देशावर हल्ला केला तेव्हा तो सीमेवर मोर्चा सांभाळणाऱ्या जवानाच्या भूमिकेतही दिसला. शास्त्रींना जे अपेक्षित होते ते साध्य झाले होते. परंतु त्याच वेळी मनोजकुमार यांना एक उद्देशही मिळाला. देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या चित्रपटांच्या माध्यमातून ते स्वत:चे विचार प्रकट करण्याचा. तेव्हा सुरू झालेला सिलसिला आजपण कायम आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..