सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म २३ जानेवारी १९४१ रोजी झाला.
दिनयार कॉन्ट्रॅक्टर हे सशक्त अभिनेते म्हणून परिचित होते. दिनयार यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. व्यावसायिक रंगभूमीपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. अनेक लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या.
हिंदी तसेच मुख्यत्वे गुजराती भाषेतील दूरचित्रवाणीवरील विविध मालिका, चित्रपट यांतून आपल्या अभिनयाने खास करुन विनोदी भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते. त्याहून अधिक रंगभूमीवरचा एक दमदार अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. अनेक नाटकांतील त्यांचा अभिनय गाजला होता. त्यांच्या अगदी छोट्या-छोट्या भूमिकादेखील रसिकांच्या स्मरणात आहेत. अभिनयासोबत लेखक व दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले होते. जवळपास पाच दशके रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या ज्येष्ठ कलावंताने केलेल्या ‘बाजीगर’, ‘खिलाडी’, ‘बादशाह’, ‘३६ चाइना टाउन’ यांसारख्या चित्रपटातील भूमिकाही प्रचंड गाजल्या. रंगभूमी आणि नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना २०१९ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे ५ जून २०१९ रोजी निधन झाले.
संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply