अभिनेता टायगर श्रॉफ चा यांचा जन्म दि. २ मार्च १९९० रोजी मुंबई येथे झाला.
टायगर श्रॉफ हा अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा होय. टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ आहे. मुळ गुजराती कुटुंबातील असलेल्या टायगरचे आजोबा काकूभाई श्रॉफ (जॅकी श्रॉफचे वडील) गुजराती ज्योतिषी होते. तर त्याच्या टायगरची आई आएशा श्रॉफ फ्रेंच आणि बंगाली वंशाच्या आहेत. टायगरला एक धाकटी बहीण असून तिचे नाव कृष्णा आहे. कृष्णा टायगर श्रॉफ पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. टायगर मार्शल आर्ट्समध्ये पारंगत आहे.
टायगर श्रॉफने क्रिती सनोन सोबत साजिद नाडियाडवाला यांच्या ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये डेब्यू केलं होतं. हा टायगर श्रॉफचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यानंतर टायगर श्रॉफने मागे वळून पाहिले नाही. बॉलीवूडमध्ये येण्याआधी टायगरला डान्स, स्पोर्ट्स आणि मार्शल आर्ट्समध्ये रस होता. त्याने अभिनयात येण्याबाबत काहीच विचार केला नव्हता. वयाच्या चौथ्या वर्षापासून टायगर श्रॉफने मार्शल आर्टच प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली होती. ‘बागी’, ‘फ्लाइंग जट’, ‘मुन्ना मायकल’, ‘बागी 2, ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटांमध्ये टायगरने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. रिअल लाईफमध्ये टायगर आणि दिशा पटानीची जोडी असल्याची चर्चा आहे. ‘बागी 3’ मध्ये टायगर आणि श्रद्धा ऑनस्क्रिन कपल म्हणून दिसले होते. त्यांची जोडी फॅन्समध्ये खूपच पसंत केली जाते. या दोघांनीही अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे मध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. तसंच हे दोघंही लहानपणापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एवढंच नाहीतर एकेकाळी टायगरचा श्रद्धावर क्रशही होता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply